The point now – लहानपणापासून आपली आई घरात बनवलेला आयुर्वेदिक लेप चेहऱ्यावर लावत असे. त्यामुळे तिचा चेहरा अतिशय सुंदर आणि माऊ दिसायचा. पण काळांतराने या गोष्टी कमी होत गेल्या. आई अजीचा रामबाण उपाय सोडून आपण बाहेरचे प्रॉडक्ट वापरायला लागलो.आणि त्यामुळे आपल्या स्किनची चेहऱ्याचे अधिकच वाईट अवस्था होत गेली. कारण बाहेरच्या स्किन केअर प्रॉडक्ट मध्ये केमिकल असते. म्हणून काही जुने नैसर्गिक आणि चेहऱ्यासाठी उत्तम उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
तुळशीला त्याच्या औषधी गुणधर्मांसाठी ओळखले जाते. त्याचा काढा बनवून प्यायल्याने सर्दी, फ्लू सारख्या समस्यांपासून सुटका मिळते. तुळशी च्या पाणांने त्वचा देखील बरी होते.आणि त्यात असलेले अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म त्वचेला पिंपल्स पासून वाचवतो. तुळशीच्या पानांचा फेस पॅक बनवून चेहऱ्यावर लावल्याने त्वचेला अनेक फायदे होतात. हा फेस पॅक बनवणे खूप सोपे आहे. हे लावल्याने स्किन ग्लोइंग आणि मऊ होते. आज आम्ही तुम्हाला तुळशीमध्ये अनेक गोष्टी मिसळून फेस पॅक बनवण्याची पद्धत सांगणार आहोत. तुमची त्वचा निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही ते लावू शकता.
• तुळस आणि मध
हा फेस पॅक बनवण्यासाठी प्रथम तुळशीची पाने बारीक वाटून घ्या. आता या पेस्टमध्ये मधाचे काही थेंब टाका आणि मिक्स करा. हा फेस पॅक चेहऱ्यावर लावा. कमीतकमी 20 मिनिटे चेहऱ्यावर राहू द्या. त्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे चेहऱ्यावर ग्लो येतो.
• तुळशी आणि एलोवेरा फेस पॅक
हा फेस पॅक बनवण्यासाठी प्रथम तुळशीची पाने मिक्सरमध्ये बारीक करून घ्या आणि नंतर त्यात कोरफडीचा थोडा ताजा पल्प घाला. ते चांगले मिसळा आणि कमीतकमी 15 मिनिटे चेहऱ्यावर लावा. त्यानंतर साध्या पाण्याने धुवा. हे आठवड्यातून 2 ते 3 वेळा करा. काही दिवसांनी तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर चमक पाहायला मिळेल.
• तुळशी आणि बेसन
हा फेस पॅक तुमच्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. तुळस बारीक करून त्यात बेसन घालावे. त्यानंतर त्यात थोडे गुलाबजल टाका. त्यानंतर ही पेस्ट थोडावेळ लावा आणि कोरडे होईपर्यंत राहू द्या. ज्यांना पिंपल्स ची समस्या आहे त्यांच्यासाठी हा फेस पॅक या समस्येवर रामबाण उपाय आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम