देवळा : कृषी विभाग तसेच लोकसहभागातून भिलवाड ता. देवळा येथे वनराई बंधारा बांधून पाणी अडवा पाणी जिरवा हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आल्याची माहिती कृषी सहाय्यक व्ही.पी.पवार यांनी दिली. यामुळे गावातील पाणी गावातच अडवून पाण्याची पातळी वाढून सिंचनक्षेत्र विकसित होण्यासाठी मदत होणार आहे.
भिलवाड परिसरात पावसाने चांगली हजेरी लावली असून ,नदी ,नाले व ओहोळांच्या माध्यमातून पाण्याची मोठी उपलब्धता निर्माण झाली आहे. हे वाहून जाणारे पाणी अडवले व जिरवले जावे यासाठी कृषी विभाग व लोकसहभागातून ओहोळ परिसरात वनराई बंधारा बांधण्यात येत असून त्यामुळे परिसरातील सिंचनक्षेत्र वाढण्यास मदत होणार आहे.
यासाठी तालुका कृषी अधिकारी सचिन देवरे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. याकामी कृषी सहाय्यक व्ही.पी.पवार यांच्यासह ग्रामस्थ यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम