धक्कादायक ! संस्कृतीला तिलांजली ; भावाने केले चक्क बहिणी सोबत लग्न…

0
16

स्वाती कदम

द पॉइंट नाऊ : लग्न म्हणजे एक पवित्र बंधन हेच आज पर्यंत आपण ऐकत आलो. खूप गोष्टी या लग्नासोबत येतात आणि आज-काल सोशल मीडिया वरती असंख्य व्हिडिओ रील वायरल होताना आपल्याला दिसतात. लग्नामध्ये नवरा नवरीचा डान्स लोकांच्या गमती जमती या सर्व गोष्टी पटकन वायरल होतात अशा असंख्य व्हिडिओज इंटरनेटवर वायरल आहेत परंतु एका भावाने बहिणी सोबत रचलेले लग्न हे योग्य आहे का ? अर्थातच ते अयोग्य आहे.

लग्न एक पवित्र बंधन असून हा असला भयानक प्रकार कोणी करेल याची कल्पनाही आपल्याला नाही .भाऊ बहिणीचे पवित्र नाते या अशा पवित्र नात्याची अशाप्रकारे दिंड काढली जाईल असे लोकांना वाटले नव्हते परंतु हे प्रकरण खरंच घडले आहे. कलियुग बदलेले एवढं माहीत होतं पण एवढं बदलेल हे कोणास ठाऊक होतं.

भावानी बहिणी सोबत रचलेले लग्न ही गोष्ट जेव्हा लोकांसमोर आली तेव्हा लोक अतिशय संतापले होते. त्यांनी याच्यावर खूप टीका केल्या हे विचित्र प्रकरण फिनलंडमधील एका शहरातील आहे. हे प्रकरण घडण्याच्या तीन वर्षा आधी मुलीच्या वडिलांनी आणि मुलाच्या आईने लग्न केले होते. लग्नाच्या आधीच ते दोघे एकमेकांना ओळखत असल्याने पुढे ते दोघे रिलेशनशिपमध्ये सुद्धा आले. त्यांची भेट तिच्या सावत्र आईच्या वाढदिवसात झाली होती.

त्यानंतर रिलेशनशिप मध्ये असल्याने खूप काळ उलटून गेल्यामुळे त्यांनी एकमेकांशी लग्न करायचं ठरवले. आधी त्यांच्या आई-वडील एकमेकांना डेट करत होते. आई वडिलांचे लग्न झाले त्याचबरोबर यांनी स्वतःचेही लग्न केले. आता त्यांचे सुखी वैवाहिक जीवन सुरु आहे. त्यांच्या आई-वडिलांनुसार ते दोघे एकत्र राहणे गरजेचे आहे कारण त्यांचा एकमेकांवर खूप प्रेम आहे. असं त्यांचे म्हणणं आहे सध्या हे प्रकरण सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना आपल्याला दिसते.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here