दादाजी हिरे
द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; वाखारी ता देवळा येथुन देवळा शहरात जाण्यासाठी वाखारी ग्रामस्थांनी खाजगी प्रवासी वाहतुक बंद करून एक गाव एक बस सेवा सुरु केली होती परंतु कोरोना काळ व लॉक डाऊन च्या पार्श्वभुमीवर गेल्या दिड वर्षापासून हि बस सेवा बंद होती.
लॉक डॉऊन शितील केल्याने आता आठवडे बाजार, शाळा व महाविद्यालय सुरु झाल्याने ग्रामस्थांच्या मागणीनुसार आज सोमवार 18-10-2021 रोजी वाखारी ते देवळा हि बससेवा सुरु करण्यात आली
यावेळी माजी संरपंच मंगेश केदा आहेर यांच्या हस्ते बसचे पूजन करण्यात आले बसचे चालक व कंडाक्टर यांचा सत्कार करून बस सेवा सुरू करण्यात आली यावेळी बाळासाहेब जाधव प्रकाश जाधव राकेश ठाकरे दादाजी गुंजाळ वैश्वव आहीरे साहेबराव ठाकरे वाखारी ग्रामस्थ उपस्थित होते
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम