घरच्या घरी सोप्या पद्धतीने आपला चेहरा कसा उजळेल काही टिप्स पुढीलप्रमाणे!!!

0
36

 

आपण आपल्या इतर गोष्टींकडे जेवढे लक्ष देतो तेवढे आपण आपल्या त्वचेकडे लक्ष देतो का? बोलण्याचे तात्पर्य हेच की आपण आपल्या प्रत्येक गोष्टीवर इतके लक्ष देतो मग आपला त्वचेवर का नाही.

तुम्हाला खरंच वाटते का की तुम्ही तुमच्या त्वचेची काळजी योग्यरीत्या रोज घेता?घरच्या घरी सोप्या पद्धतीत आपला चेहरा कसा उजळवू शकतो याचे काही उपाय पुढील प्रमाणे.

१. पहिल्यांदा रात्री झोपण्याच्या आधी थंड पाण्याने स्वच्छ तोंड धुवून घेणे त्यानंतर मॉश्चरायझर किंवा तिळाचे तेल दोन थेंब आपल्या हातावर घेऊन पूर्ण चेहऱ्यावर दोन मिनिटे मसाज करावी याने काय होईल याने आपल्या चेहऱ्यावर ब्लड सर्क्युलेशन होईल सकाळपासून थकलेला चेहरा रात्री रिलॅक्स होईल. हे रोज केल्यास चेहरा ग्लो होण्यास मदत मिळते.

२. सकाळी फ्रेश झाल्यानंतर पहिल्यांदा आपण सनस्क्रीम लावावी सनस्क्रीम ही शरीरासाठी खूप महत्त्वाची आहे फक्त बाहेर जाताना लोक लावतात पण आपण घरातही ती लावू शकतो आपली स्किन कळी होण्या पासून जर टाळायचे असेल तर सनस्क्रीम लावणे हे अतिशय महत्त्वाचे आहे बाहेर निघताना सनस्क्रीम ही लावलीच पाहिजे ज्यामुळे तुमची त्वचा काळी होण्यापासून वाचते.

३. जास्त करून सुगंधित साबणे न वापरता आयुर्वेदिक साबण वापरण्याचे प्रयत्न करा ज्यामध्ये केमिकल कमी असेल आणि सुगंध जास्त नसेल.

४. चेहऱ्यावरती जास्त कुठलेही प्रॉडक्ट वापरू नये ब्लीच, हेअर वॅक्सिंग ,फेस वॅक्स जास्त प्रमाणात करू नये त्यामुळे तुम्हाला पिंपल्स येण्याची शक्यता असते.

५.घरच्या घरी सोप्या पद्धतीत तुम्ही तुमचा फेस पॅक सुद्धा बनवू शकता म्हणजे उटना वापरून हळद ,मलाई ,बेसन यासारख्या केमिकल मुक्त गोष्टींना वापरून तुम्ही तुमचा घरच्या घरी फेसपॅक बनवू शकता हा फेसपॅक तुम्ही आठवड्यातून एकदा लावू शकता

६.शेवटचं आणि सर्वात महत्त्वाचा रोज जास्त प्रमाणात पाणी प्यावे सकाळी उठल्यानंतर एक लिटर ते रात्री झोपेपर्यंत जेव्हा वेळ भेटेल तेव्हा पाणी पीत राहावे त्यामुळे आपण हायड्रेट राहतो आणि आपली त्वचा आपल्या शरीर अधिक चांगले राहते. या टिप्स जर तुम्ही सात दिवस रोज केल्या तर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यात खूप बदल दिसेल.

— स्वाती कदम

 

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here