देवळा ; थेट सरपंच पदाचे आरक्षण पुढीलप्रमाणे

0
48

देवळा ; तालुक्यातील घोषित झालेल्या तेरा ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण पुढीलप्रमाणे दहिवड,- (अनुसूचित जमाती महिला ) ,

फुलेनगर (-अनुसूचित जाती),

वासोळ – (नामाप्र, ) ,

वाजगाव- (अनुसूचित जमाती महिला )

मटाने,- (अनुसूचित जमाती),

भऊर- (अनुसूचित जमाती महिला) , खामखेडा- (अनुसूचित जमाती),

विठेवाडी- (अनुसूचित जमाती) ,

डोंगरगाव – (-सर्वसाधारण महिला),

श्रीरामपूर -(अनुसूचित जमाती महिला) ,

चिंचवे,-(सर्वसाधारण महिला) ,

कनकापूर, -(अनुसूचित जमाती)

सटवाईवाडी- (सर्वसाधारण) याप्रमाणे

देवळा १३ ग्रामपंचायतींसाठी १८ डिसेंबर रोजी मतदान

ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या दहिवड, फुलेनगर, वासोळ, वाजगाव, मटाने, भूऊर, खामखेडा, विठेवाडी, डोंगरगाव, श्रीरामपूर, चिंचवे, कनकापूर, सटवाईवाडी या गावातील ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच पदासह पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहिर केला आहे .

निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे उमेदवारी अर्ज दाखल करणे – २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर ,छाननी -५ डिसेंबर ,माघार व चिन्ह वाटप -७ डिसेंबर , मतदान -१८ डिसेंबर व मतमोजणी २० डिसेंबर रोजी घेण्यात येईल . अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार विजय सूर्यवंशी यांनी दिली .

वरील १३ ग्रामपंचायतीच्या निवडणूकिचा कार्यक्रम घोषित झाल्यानें इच्छुक उमेदवारांनी गुडघ्याला बाशिंग बांधले असून, त्यांनी वार्ड निहाय मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर भर दिला आहे . यामुळे राजकीय धुराळा उडाला आहे . खरे चित्र माघारी नंतर स्पष्ट होईल .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here