द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; देवळा तालुक्यात जनावरांवर लम्पीआजाराचा प्रादुर्भाव दिसून येत असुन अनेक शेतकऱ्यांना हा रोग नवीन असल्याने माहिती नाही .

यामुळे बैल तसेच गाय म्हैस हि दुभती जनावरे देखील संकटात आहेत. पशुसंवर्धन विभागाकडे संख्याबळ नसल्याने पशु पालक संकटात सापडला आहे .तालुक्यातील खर्डे व खामखेडा आदी परिसरात शेतक-यांच्या बैलाच्या अंगावर गाठी उठून पाय सुजले आहेत.
जनावरांना पोटाच्या खालच्या भागास बेंबीच्या खाली गाठी आल्या आहेत.ताप येणे, डोळ्यातून तसेच नाकातून रक्त स्त्राव होणे, चारा कमी खाणे, भूक मंदावणे अशी लक्षणे दिसत आहेत.
हा आजार प्रामुख्याने गाय, बैल, वासरांना अधिक दिसत आहे. देशी जनावरांपेक्षा संकरित जनावरे या विषाणूला लवकर बळी पडत आहेत.ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना या नवीन आजाराची माहिती नसून अनेक शेतकरी या आजाराकडे दुर्लक्ष करत असुन ग्रामीण भागात पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने शेतकऱ्यांना खाजगी डॉक्टरांडून जनावरांवर उपचार करून घ्यावा लागत आहे.
या आजारामुळे जनावरे अशक्त बनत असुन येन कामांच्या टप्प्यात महागडे जनावरे आजारी असल्याने शेतकरी वर्ग संकटात आहे.दुभते जनावर ह्या आजाराने बाधित असल्यामुळे दूध उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट दिसून येत होते .या रोगात जनावरांची त्वचा खराब झाल्याने जनावर विकृत दिसत आहेत. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची पद रिक्त असल्याने या आजारावर शेतकऱ्यांना खाजगी महागड्या दराने औषधउपचार करावा लागत आहे.
रोग नवीन असल्याने लवकर समजत नाही.ताप, डोळे, नाकातून स्त्राव येणे, चारा कमी खाणे, भूक मंदावणे आदी लक्षणे आहेत. रोग वेगाने पसरणार असल्याने पशुसंवर्धन विभागाकडून प्रभावी उपाय योजना करण्यात यावी व या जनावरांना शासनामार्फत लसीकरण करावे.
संदीप शिंदे,शिंदेवाडी
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम