द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; जळगाव येथिल राजनंदिनी बहुउद्देशीय संस्था आणि राजपूत करणी सेने तर्फे नुकतेच राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण पार पडले. यात भुसावळ तालुक्यातल्या खडका येथील काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालयातील शिक्षक गौरव भोळे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह आणि शाल देऊन त्यांचा सत्कार पार पडला.
भोळे हे महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेचे जळगाव जिल्धाध्यक्ष देखील आहेत. त्यांच्या उल्लेखनीय शैक्षणिक कार्याबद्दल त्यांना हा बहुमान प्राप्त झाला. भोळे यांच्याद्वारे नेहमीच शैक्षणिक दृष्ट्या सदैव उत्तम कार्य केले गेलेले आहे. ज्याबद्दल त्यांना या आधी देखील विविध सामाजिक संस्थांद्वारे सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्या बद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम