नाशिकच्या प्रेमीयुगलांचे गोव्यात विष प्राशन; प्रियकराचा मृत्यू प्रियसी बचावली

0
34

नाशिक : प्रेमासाठी जान भी कुरबान असे म्हणणारे प्रेमी काही कमी नाहीत असाच प्रत्यय आला आहे नाशिक शहराला, घरच्यांचा लग्नाला विरोध होता म्हणून नाशिक येथील एका प्रेमी युगलाने थेट गोवा गाठले आणि येथील एका हॉटेल मध्ये विष प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे वृत्त समोर आले आहे. या धक्कादायक घटनेत मुलाचा मृत्यू झाला तर मुलीची प्रकृती अद्याप स्थिर असल्याची माहिती आहे, ती सध्या रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.

आज घडलेल्या या धक्कादायक घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. नाशिक येथील गौरव यादव या 21 वर्षीय तरुणाचे एका 22 वर्षीय तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र या संबंधांना दोघांच्या घरच्यांनी कडाडून विरोध केल्याने दोघांनी टोकाचे पाऊल उचलत, घरातून पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला मात्र ते गेल्या आठवड्यात रेल्वेने नाशिकहून गोव्याला पोहोचले व त्याठिकाणी दोघांनी निर्णय बदलत समाजाला व घराला कंटाळून आयुष्याचा प्रवास थांबवण्याचा निर्णय घेतला.

या दोघांनी आपले नाव बदलत किशोर अय्यर या बनावट नावाने दक्षिण गोव्यातील कोलवा येथील एका गेस्ट हाऊसमध्ये राहण्यासाठी पुरावा म्हणून कागदपत्रे दिली. ३१ ऑक्टोबर रोजी रात्री त्यांनी विषप्राशन करून आपली जीवनयात्रा संपवण्याचा निर्णय घेत प्रयत्न केला. मात्र दुसऱ्या दिवशी दि. ०१ नोव्हेंबर रोजी सायंकाळी गौरवचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून मुलीची तब्येत स्थिर असल्याचे कोलवा पोलिसांनी सांगितले आहे.

घरच्यांचा लग्नाला प्रखर विरोध असल्याने पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतल्याचे मुलीने पोलिसांना सांगितल्याची माहिती गोवा पोलिसांनकडून समजत आहे. याबाबत गोवा येथील कोलवा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास कोलवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक फिलोमेनो कोस्टा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत असून या घटनेने खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. यामुळे देशात अजूनही प्रेमाला स्थान नसून प्रेम बळी अजून किती दिवस जाणार याबाबत चर्चा सुरू झाली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here