देवळा येथे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त आशा सेविकांचा सन्मान

0
115
देवळा तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त आशा सेविकांना नवदुर्गा महाराष्ट्राची पुरस्काराने सन्मानित करतांना तालुका अध्यक्षा उषाताई बच्छाव समवेत पदाधिकारी (छाया - सोमनाथ जगताप )

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त देवळा तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जि प च्या माजी समाजकल्याण सभापती व तालुका अध्यक्षा उषाताई बच्छाव यांनी “नवदुर्गा महाराष्ट्रची” हा उपक्रम राबवून शहरातील नऊ आशा वर्कर यांचा कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .

देवळा तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त आशा सेविकांना नवदुर्गा महाराष्ट्राची पुरस्काराने सन्मानित करतांना तालुका अध्यक्षा उषाताई बच्छाव समवेत पदाधिकारी (छाया – सोमनाथ जगताप )

पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने देवळ्यात रक्तदान शिबीर तसेच महिल काँग्रेसच्या वतीने प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांच्या नेतृत्वाखाली “नवदुर्गा महाराष्ट्राची” हा उपक्रम राबवून,

कोरोना काळात स्वतःची व कुटुंबाची काळजी न घेता जनजागृती करणाऱ्या सोनाली आहेर , अर्चना शाहिल , संजीवनी केदारे , चिता वाणी , मनिषा बच्छाव , , सांगता निकम , ज्योती अहिरे , मनिषा कांबळे , विजया पाटील या आशा स्वयंसेवीकांचा साडी, दुर्गा सप्तशती पुस्तक व गुलाब पुष्प , कोरोन योद्धा प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले . अशी माहिती तालुका अध्यक्षा व माजी सभापती उषाताई बच्छाव यांनी दिली .यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष व जी प सदस्य यशवंत शिरसाठ ,जेष्ठ नेते पंडितराव निकम , बाजार समितीचे माजी सभापती योगेश आहेर, जि प सदस्या नूतन आहेर , युवक तालुका अध्यक्ष सुनील आहेर ,शहर अध्यक्ष दिलीप पाटील ,समता परिषदेचे आबा खैरणार , जितेंद्र आव्हाड युवा मंचचे जिल्हाध्यक्ष सचिन सूर्यवंशी, महिला आघाडी च्या वैशाली खोंडे ,पुष्पा गुजरे आदी उपस्थित होते .

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here