द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; देवळा तालुक्यात खळबळ जनक घटना घडली असून एका अल्पवयीन प्रेमी जोडप्याने शहरातील नामांकित हॉटेल मध्ये विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती आहे. मुलगी फुले माळवाडी तर मुलगा हांडवा शिवारातील असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली.
17 वर्षाचे दोन अल्पवयीन प्रेमी युगल यांना हॉटेलमध्ये प्रवेश कसा मिळाला याची सर्वत्र चर्चा आहे.
सविस्तर माहिती अशी की या दोघ प्रेमीयुगलांनी अल्पवयीन असतांना देखील लॉज मध्ये प्रवेश मिळवला व विष पिउन दोघांनी आत्महत्येचा प्रयत्न केला असून त्यांनी व्हाट्सप वरती आत्महत्यचे स्टेटस ठेवले , हे स्टेट्स बघून त्याच्या मित्रांनी संबंधित हॉटेलमध्ये धाव घेतली. दोघांना देवळा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
त्यांची प्रकृती स्थिर असून पुढील उपचारासाठी मालेगाव येथे शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.
पोलिस निरीक्षक भोज यांच्याशी संपर्क साधला असता, अद्याप गुन्हा दाखल झालेला नसून पुढील कार्यवाही सुरू आहे, संबंधित दोषीं आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असे भोज यांनी सांगितले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम