भारती पवार ‘ब्रिक्स’ च्या बैठकीत पहिल्यांदाच सहभागी

1
84

द पॉईंट प्रतिनिधी : ब्रिक्स (BRICS) देशांच्या संघटनेची बैठक संपन्न होत आहे, यामध्ये भारताचे प्रतिनिधित्व केंद्रीय मंत्री व महाराष्ट्रची लेक भारती पवार सहभागी झाल्या आहेत. या देशांच्या आरोग्य मंत्र्यांची बैठक सुरू आहे. यावेळी पवार बोलतांना म्हणाल्या की भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या गतिशील नेतृत्वात जागतिक हिताच्या दृष्टीने धोरणात्मक सहकाऱ्याकडे वाटचाल करण्यासाठी कटिबद्ध आहोत. तसेच देशाला दिशा देण्याचे काम पंतप्रधान करत आहेत.

जगाने एकत्रित येऊन कोरोना सारख्या महामारीचा सामना करावा असे आवाहनही पवार यांनी सर्व देशांच्या प्रतिनिधीना केले. यावेळी कोविड आणि नॉन कोविड तथा रोगनिदान, लस, औषध निर्माण इत्यादींमध्ये नवकल्पनांना गती देऊन आरोग्यसेवा देणाऱ्या सुविधा अधिक चांगल्या करून जगाला भेडसावणाऱ्या आरोग्याच्या समस्यांविरुद्ध एकत्रित लढा देण्यासाठी तसेच आरोग्य दृष्टीकोनावर भर देऊन साथींच्या रोगाविरोधात एकत्र येऊन काम करण्याचे सर्व ब्रिक्स देशांच्या आरोग्य मंत्र्यांना आवाहन त्यांनी केले.

बैठक प्रसंगी भारत सरकारचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री, आयुष मंत्री सर्वानंद सोनोवाल, महामहिम डॉ. मा. शाओवे, (मंत्री, राष्ट्रीय आरोग्य आयोग, चीन), महामहिम डॉ.जो फाहला (आरोग्य उपमंत्री, दक्षिण आफ्रिका), महामहिम श्री. मार्सेलो क्विरोगा (आरोग्य मंत्री, ब्राझील), महामहिम श्री.मिखाईल मुराश्को (आरोग्य मंत्री, रशिया), महामहिम डॉ. टेड्रोस अदनोम (महासंचालक, डब्ल्यूएचओ) तसेच सन्मानित सदस्य, इतर अधिकारी भारत सरकारचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते. या बैठकीत विविध आरोग्य विषयक विषयांवर चर्चा करण्यात आली.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

1 COMMENT

  1. आमच्या महाराष्ट्र राज्याच्या ची शान आमच्या देवळा चादवड कळवण मालेगाव मतदारसंघ मधून निवडून आले आहे.
    माननीय सौ. भारती ताई पवार याना मानाचा मुजर
    ताई तुम्हाला
    जय शिवराय जय जिजाऊ
    जय महाराष्ट्र.
    फक्त गरीबी साठी थोडी जागा राहु द्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here