मिशन कवच कुंडल अंतर्गत मटाने येथे घरपोहच लसीकरण

0
44

प्रविण आहेर
द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : नाशिक जिल्हा प्रशासनाकडून मिशन कवच-कुंडल अंतर्गत लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर देवळा तालुक्यातील प्रा.आ.
केंद्र खर्डा अंतर्गत उपकेंद्र मटाने येथे एक दिवसाआड २०० लस तालुका प्रशासनाकडून उपलब्ध होत आहेत.

आरोग्य केंद्रातील कर्मचारी गावातील वाड्या-वस्त्या, आदिवासी वस्ती आणि त्यांच्या घरी जात लसीकरण मोहीम पूर्ण करण्याचे काम करीत आहेत.

मटाणे येथे सकाळी ९ वाजेपासून लसीकरण मोहीम सुरू होते. तालुका प्रशासनाकडून २०० उपलब्ध झाल्या. समुदाय आरोग्य अधिकारी डॉ तिलोत्तमा देवरे यांच्या देखरेखीखाली लसीकरण सुरू करण्यात आले. आरोग्य विभागाचे विशेष कौतुक म्हणजे मटाने येथील वाड्या वस्त्या, आदिवासी पाडा भउर फाटा, अंगणवाडी येथे जात लसीकरण, मिशन कवच-कुंडल यशस्वी करण्याचे काम करीत आहेत. आरोग्य विभागाच्या या उपक्रमामुळे दिव्यांग व्यक्ती व कुटुंबीयांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.

यावेळी समुदाय आरोग्य अधिकारी तिलोत्तमा देवरे, सेवक शिवाजी सोनवणे, आरोग्यसेविका भामरे, अंगणवाडीसेविका कमल आहेर, वंदना पवार, प्रमिला पवार,सुरेखा केदारे इत्यादी कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here