सोग्रस फाटा ते सटाणा रस्त्याची दुर्दशा ; भाजपाचा रास्ता रोको

1
33

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; सोग्रस फाटा ते सटाणा रस्त्याची अक्षरश दुरवस्था झाली आहे , रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अपघात होतात . प्रशासनाला वारंवार सुचना , विनंती करूनही दखल घेतली जात नसल्याने उद्या गुरुवारी (दि १४)रोजी भाजपच्या वतीने सकाळी १० वाजता आमदार डॉ राहुल आहेर व जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांच्या नेतृत्वाखाली भावडबारी घाटाच्या पायथ्याशी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती तालुका अध्यक्ष किशोर चव्हाण यांनी एका प्रसिध्दी प्रकाद्वारे दिली .

पत्रकाचा आशय असा की , जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येणाऱ्या रस्त्यांची विशेषतः सोग्रस फाटा ते सटाणा रस्त्याची अक्षरश: दुरवस्था झाली आहे , रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अपघात होतात . यामुळे लवकरात लवकर रस्त्यांची दुरुस्ती करावी या मागणीचे निवेदन भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांनी पंधरा दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते .मात्र प्रशासनाने अद्याप दखल घेतली नसल्याने तीव्र संतापाची लाट उसळली आहे . असे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर भाजपच्या वतीने आमदार डॉ राहुल आहेर व जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (दि १४) रोजी सकाळी १० वाजता भावडबारी घाटाच्या पायथ्याशी रास्ता रोको आंदोलन छेडले जाणार असून , यावेळी उपस्थित राहावे ,असे आवाहन तालुका अध्यक्ष किशोर चव्हाण यांनी केले आहे .

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here