अंधारलेल्या गावांना ‘प्रकाशमय’ दिलासा ; नूतन आहेर यांच्या प्रयत्नांना यश

0
34

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; देवळा तालुक्यातील अनेक गावात वर्षोनुवर्षे अंधारच होता, साधे पथदिवे देखील लोकप्रतिनिधीनी लावायला टाळाटाळ केली, कागदावर अनेक ‘दिवे’ लागले, प्रत्यक्षात मात्र अंधारच होता.

हाच अंधार दूर करण्यासाठी वाखारी गटाच्या जिल्हा परिषद सदस्या डॉ. नूतन सुनील आहेर यांच्या विशेष प्रयत्नातून पारंपारिक ऊर्जा विकास योजने अंतर्गत सौर पथदीप बसवुन लोकार्पण करण्यात आले.

या कामाचे लोकार्पण दिनांक 10 ऑक्टोबर रोजी वार्षी, हनुमंतपाडा, मुलूकवाडी, शेरी येथे करण्यात आले , यावेळी प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील (गोटूआबा) आहेर हे उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना डॉ. आहेर म्हणाल्या की विज बिल प्रश्नांच्या तांत्रिक अडचणीमुळे ग्रामपंचायतीचे पथदीप बंद असल्यामुळे गावातील नागरिकांना अंधाराला सामोरे जावे लागत असल्याने मा. पालक मंत्री छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या सहकार्याने अपारंपारिक ऊर्जा विकास योजनेअंतर्गत वाखारी गटातील २३ गावांना तब्बल ३९ सौर पथदीप मंजूर करण्यात यश आले व त्याचे काम सुरू होऊन गटातील गावे प्रकाशमय होतांना दिसत असल्याने समाधान होत आहे.

यापूर्वी गटातील सुभाष नगर, वाजगाव, वडाळे येथील सौर पथदीप लावून लोकार्पण करण्यात आले सदर पथदीप सौर ऊर्जा व विद्युत उर्जेवर चालणारे असल्याची माहिती त्यांनी दिली.

वार्षी , हनुमंतपाडा,  येथे यावेळी सरपंच बळीराम वाघ मा.सरपंच भास्कर माळी , भाऊसाहेब सावकार, सुनील सावकार, बाळू निरभवणे, पुंजाराम निरभवणे, गोविंद सोनवणे, शांताराम पवार, अप्पा पवार,

मुलूकवाडी येथे नानासाहेब निकम, देविदास चव्हाण, निंबा निकम, भावराव पगारे, जीभाऊ चव्हाण, विठोबा चव्हाण, मनसाराम देवरे,

शेरी येथे शांताराम पवार, रामदास पवार, मनसाराम पवार, दयाराम पवार, वसंत गुरगुडे, नंदू देवरे, किरण पवार, महेश पवार, अरुण पवार, भारत जाधव ,रवी जाधव, भारत गांगुर्डे ,चंद्रकांत पवार, रवींद्र पवार, जयवंत पवार,

आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

 

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here