देवळा शहरात उद्या बंद ; बाजार समितीसह बाजारपेठ बंद

0
35
सोमवारच्या महाराष्ट्र बंद मध्ये सामील होऊन बंद देवळा बंद पाळण्याचे आवाहन करतांना महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते (छाया - सोमनाथ जगताप )

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; लखीनपूर मध्ये शेतकऱ्यांना चिरडण्याची घटना घडली असून याच्या निषेधार्थ सोमवारी( दि ११) रोजी अत्यावश्यक सेवा वगळता देवळा शहर व तालुक्यात बंद पुकारण्यात आला आहे.

सोमवारच्या महाराष्ट्र बंद मध्ये सामील होऊन बंद देवळा बंद पाळण्याचे आवाहन करतांना महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते (छाया – सोमनाथ जगताप )

या पार्श्वभूमीवर रविवारी महाविकास आघाडीच्या वतीने छोट्या मोठ्या व्यावसायिकांना बंद मध्ये सामील होण्याचे आवाहन करण्यात आले . यावेळी बाजार समितीचे माजी सभापती योगेश आहेर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुनील आहेर ,शिवसेनेचे शहर प्रमुख मनोज आहेर , राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष दिलीप पाटील, बाजार समितीचे संचालक जगदीश पवार, संतोष शिंदे , सचिन सूर्यवंशी, सतीश आहेर ,विश्वनाथ गुंजाळ , मनोज गुजरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान ,देवळा कृषि उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सर्व शेतकरी बांधव, खरेदी व्यापारी व संबंधित बाजार घटकांना सोमवार दिनांक (दि .११ )रोजी महाराष्ट्र बंद असल्याकारणाने कांदा व भुसार मालाचे लिलाव बंद राहतील याची सूचना केली आहे . बंद मध्ये सामील होण्याचे सर्वांना यावेळी आवाहन करण्यात आले आहे .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here