बॉल बॅडमिंटन स्पर्धेत व्ही.के.डी स्कूलच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरावर निवड

0
22
देवळा ; भावडे येथील व्ही.के.डी स्कूलच्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांसोबत संस्थेच्या सचिव मीना देवरे, प्राचार्य एन.के. वाघ , एस .एन.पाटील आदींसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ( छाया -सोमनाथ जगताप )

देवळा ; तालुक्यातील भावडे येथील व्ही.के.डी. इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी खेळाडू वृत्तीचे कौशल्य दाखवत, सब ज्युनिअर बॉल बॅडमिंटन स्पर्धेसाठी नाशिक जिल्हा ग्रामीण बॉल बॅडमिंटन असोसिएशन मार्फत निवड करण्यात आली.

देवळा ; भावडे येथील व्ही.के.डी स्कूलच्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांसोबत संस्थेच्या सचिव मीना देवरे, प्राचार्य एन.के. वाघ , एस .एन.पाटील आदींसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ( छाया -सोमनाथ जगताप )

सदर राज्यस्तरीय स्पर्धा गोंदिया येथे 13 ऑक्टोबर ते 16 ऑक्टोबर दरम्यान आयोजित केली आहे. राज्यस्तरीय स्पर्धेसाठी चिराग भामरे, आयुष पाटील, ओम बोरसे, चैतन्य ठाकरे, यशश्री निकम, अक्षरा पगार, ईशान मनेरे, पूर्वा पवार, अदिती सावकार, पल्लवी बच्छाव, या विद्यार्थ्यांची निवड झाली.

यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन संजय देवरे व सचिव मीना देवरे यांनी कौतुक केले आहे . या विद्यार्थ्यांना विद्यालयाचे प्राचार्य एन. के, वाघ, एस. एन.पाटील आदींसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पंकज चेटलापल्ली, गगन कुमार सिंह, मुदसर सय्यद, कैलास सागर , बबलू देवरे यांनी शुभेच्छा दिल्या. विद्यालयाचे क्रीडा शिक्षक यज्ञेश आहेर यांचे यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here