द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; ” शिक्षकांनी शिक्षण विद्यार्थीकेंद्री केले तर शिक्षणात क्रांती घडवता येते. मनोरंजनातून कृतियुक्त अध्यापन करणे गरजेचे असून विद्यार्थी अतिशय महत्वाचा घटक आहे. आठवड्यात आढावा बैठक घेऊन विद्यार्थी, पालक, व शिक्षक यांनी एकत्र येणे गरजेचे आहे.
तसेच शिक्षणातील गुणवत्ता वाढीची पंचसूत्री महत्वाची आहे” असे उदगार नंदुरबार जिल्ह्यातील जि. प. शिक्षणाधिकारी एम. व्ही. कदम यांनी काढले. महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित लोकनेते व्यंकटराव हिरे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त जनसंपर्क विभाग महात्मा गांधी विद्यामंदिर, मराठी विभाग व महाविद्यालयाच्या जनसंपर्क विभागांतर्गत “लोकनेते व्यंकटराव हिरे” व्याख्यानमालेत” शिक्षणातील गुणवत्ता वाढीची पंचसूत्री ” या विषयावर ते बोलत होते.
कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते व नंदुरबार डायटचे प्रमुख डॉ. जगराम भटकर यांनी प्राथमिक व माध्यमिक विभागात अध्यापन करतांना कोरोना काळात कोणत्या नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग केला याची माहिती दिली. तंत्रस्नेही उपशिक्षक रवींद्र गुरव यांनी नंदुरबार जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात नवीन तंत्रज्ञानांचा वापर करून कोरोना काळात संधीचा कसा फायदा करून शैक्षणिक कामात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला याची माहिती दिली.
मुख्याध्यापक दिनेश साळुंखे यांनीही नवीन उपक्रमाबाबत माहिती देतांना विद्यार्थ्यांना त्याचा कसा फायदा झाला याची माहिती दिली. महाविद्यालयाचे प्राचार्य प्राचार्य डॉ. बी. एस जगदाळे यांनी अध्यक्षीय भाषणात या व्याख्यानमालेचा उद्देश सांगतानाच कोरोना काळातील शिक्षण हे प्राप्त परिस्थितीत तंत्रस्नेही शिक्षकांनी उत्कृष्ठ पणे पूर्ण केले. यानिमित्ताने अनेक शिक्षकांनी या कोरोना तंत्राचा वापर करून अध्यापन सुकर केले असे मत व्यक्त केले.
व्याख्यात्यांचा परिचय ग्रंथपाल प्रा. संभाजी व्याळीज यांनी करून दिला. डॉ. प्रकाश शेवाळे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमासाठी उपप्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, पर्यवेक्षक, प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम