मुंबई : राज्यात सत्ता संघर्ष रंगला असून निवडणूक आयोगानं धनुष्यबाण गोठवल्यानंतर शिंदे गटाला ढाल-तलवार चिन्ह आज देण्यात आले आहे. काल उद्धव ठाकरे गटाला मशाल चिन्ह देण्यात आले होते तर आज ठाकरे गटाला ढाल तलवार देण्यात आले आहे.
आज निवडणूक आयोगाने याबाबचा निर्णय दिला असून निवडणुकीसाठी दोनी गट सज्ज झाले आहेत. काल ठाकरे गटाला मशाल चिन्ह देण्यात आल्यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात हे चिन्ह व्हायरल झाले. निवडणूक आयोगाने शिंदे गटाला नवे तीन पर्याय देण्याचे आदेश काल दिले होते. त्यानंतर शिंदे गटाने निवडणूक आयोगाला तीन पर्याय दिले होते. त्यातून आयोगाकडून त्यांना ढाल-तलवार चिन्ह देण्यात आले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम