
देवळा : 10 ऑक्टोबर राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त अनुदानित अनुदानित प्राथमिक, माध्यमिक आश्रम शाळा व शरदराव पवार जुनियर कॉलेज कपालेश्वर येथे येथे प्राथमिक आरोग्य केंद्र कपालेश्वरच्या वतीने इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या मुला मुलींना जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले.

प्रारंभी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ज्ञानेश धनगे पाटील यांच्या हस्ते सरस्वती पूजन व माजी आमदार कै. पंडितराव धर्माजी पाटील तथा भाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी डॉक्टर ज्ञानेश धनगे पाटील यांनी आरोग्य स्वच्छता व जंतनाशक गोळ्या घेण्याचे महत्व पटवून दिले.
याप्रसंगी मुख्याध्यापक जगदीश सोनवणे, प्राचार्य गोरख निकम, आरोग्य सहाय्यक एस. डि. मांडवडे, आरोग्य सेविका एम.आर. ढोमसे, गटप्रवर्तक श्रीमती अर्चना सोनवणे, आशा सेविका अंजना सोनवणे आदी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम