देवळा : तालुक्यात शुक्रवारी दि ७ रोजी राज्य उत्पादन शुल्क मालेगाव विभागाने उमराणे देवळा रोडवर अवैध दारू विक्री करणाऱ्या ढाब्यावर अचानक धाडी टाकून अवैद्य दारू विक्रेत्यांवर मुंबई दारूबंदी कायदा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात येऊन अटक करण्यात आली .
या कारवाईमुळे देवळा तालुक्यात अवैद्य दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले असून ,एकच खळबळ उडाली आहे . याबाबत सविस्तर माहिती अशी की , देवळा तालुक्यात अवैद्य दारू विक्रीचा सुळसुळाट झाला असून,याकडे पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष होत आहे . हा अवैद्य धंदा सद्या तालुक्यातील जोमाने सुरू असून, नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे .याला संबंधीत विभागाने आळा घालावा अशा आशयाचे वृत्त नुकतेच प्रसिद्ध झाले होते. याची दखल घेऊन निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क मालेगाव विभागाने तालुक्यात अवैद्य दारू विक्रेत्यांवर कारवाई केली .
यामध्ये उमराणे देवळा रोड वरील उमराणे येथील हॉटेल भाऊसाहेब ढाबा, खारी फाटा येथील हॉटेल सह्याद्री ढाबा, हॉटेल रायबा ढाबा तसेच धोबीघाट येथील देश-विदेश ढाबा येथे धाडी टाकून एकूण देशी दारूच्या 106 बाटल्या व विदेशी दारूच्या 46 बाटल्या जप्त करून एकूण 14 हजार 530 रुपयांच्या मुद्देमालासह चार आरोपींना अटक करण्यात आली . सदर कारवाई विभागाचे निरीक्षक सचिन श्रीवास्तव यांच्या उपस्थितीत दुय्यम निरीक्षक पी एस कडभाने ,जवान बहिरम , मस्के व वाहन चालक महेंद्र बोरसे यांनी सदरची कारवाई केली .सदर कारवाईमुळे परिसरातील ढाब्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा चांगलाच वचक बसला असून, या कारवाईने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम