गाम्बियाने 66 लोकांच्या मृत्यूशी निगडीत भारतीय बनावटीचे कफ सिरपवर बंदी

0
32

द पॉइंट नाऊ : गाम्बियाने लहानश्या पश्चिम आफ्रिकन देशात 60 हून अधिक मुलांच्या मृत्यूसाठी दोषी ठरवन्यात आलेल्या खोकला आणि सर्दी सिरप गोळा करण्यासाठी घरोघरी मोहीम सुरू केली आहे. एका अहवालात यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. WHO ने भारताच्या मॅडेन फार्मास्युटिकल्सला त्यांच्या चार खोकला आणि सर्दी सिरपबद्दल चेतावणी दिली आहे.

AFP नुसार, WHO चा हा इशारा भूतकाळात गॅम्बियामध्ये 66 मुलांच्या मृत्यूशी संबंधित आहे. UN आरोग्य एजन्सीने असेही चेतावणी दिली आहे की दूषित औषधे पश्चिम आफ्रिकन देशाबाहेर वितरित केली जाऊ शकतात. असे झाले तर त्याचा जागतिक परिणाम होऊ शकतो.

WHO ने आपल्या एका वैद्यकीय उत्पादनाच्या अहवालात सांगितले की,”प्रयोगशाळेच्या चाचणी दरम्यान, या सर्व नमुन्यांमध्ये डायथिलीन ग्लायकोल आणि इथिलीन ग्लायकोलचे प्रमाण जास्त आढळले.”मात्र, त्यांच्या या इशाऱ्यावर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

आरोग्य मंत्रालयातील उच्च सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एसओपीनुसार, डब्ल्यूएचओला एखाद्या देशाच्या औषधाबाबत त्याच्या उपकंपन्यांबाबत कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे किंवा सल्लागार जारी करायचे असतील, तर त्या औषधाच्या लेबलचे चित्र त्या नियामकाला शेअर करावे लागेल. सहा दिवस उलटून गेल्यानंतरही, WHO ने पॅकेजिंग लेबलचा फोटो DCGI ला शेअर केलेला नाही. तसेच बॅचची माहितीही देण्यात आलेली नाही. याबाबत DCGI ने चार दिवसांपूर्वी WHO च्या जिनिव्हा कार्यालयाला ईमेल पाठवला होता.

सूत्रांनी असेही सांगितले की मेडेन फार्मास्युटिकल्सला औषध आणि सौंदर्य प्रसाधने कायद्यांतर्गत हरियाणा सरकारच्या राज्य औषध नियंत्रकाने औषधांच्या निर्यातीसाठी औषधे तयार करण्याचा परवाना दिला होता. ही चार औषधे फक्त गॅम्बियाला पाठवली गेली की इतरत्र पुरवली गेली याचाही आरोग्य मंत्रालय विचार करत आहे. मात्र, आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार हे औषध फक्त गांबियालाच पाठवण्यात आले होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here