शिवसेनेत पुन्हा फूट ? पाच आमदार दोन खासदार शिंदेंच्या गळाला? ; ‘हे’ आहेत चर्चेत

0
37
Shivsena Result
Shivsena Result

मुंबई : राज्यात बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना घायाळ केले असून संघटना कुणाची ही लधर कोर्टात सुरू असतानाच आज दसरा मेळाव्यात पुन्हा भूकंप होण्याची शक्यता वाढली आहे. शिवसेनेत झालेल्या फूटीनंतर आज दोन दसरा मेळावे (Dasara Melava) पार पडत आहे. शिंदे गटाच्या या मेळाव्यात शिवसेनेचे (Shivsena) दोन खासदार आणि पाच आमदार प्रवेश करणार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा दावा शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमाने (MP Krupal Tumhane) यांनी केला असून यामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेना फुटीचे ग्रहण थांबण्याचे चिन्हे तूर्तास दिसत नाही. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत सहा खासदार तर 15 आमदार आहेत. हा दावा राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप घडवण्याची चिन्हे आहेत , बीकेसीत कोणते खासदार, आमदार प्रवेश करणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले. मात्र शिवसेनेत निष्ठावंत राहिले गद्दार गेलेत हा दावा शिंदे गटाकडून दिशाभूल करणारा आहे असा दावा शिवसेनेने केला आहे.

आज मुंबईत दोन मेळावे होत आहेत शिंदे गटातील खासदार कृपाल तुमाने यांनी आज नागपूरमध्ये हा दावा केला त्यानंतर मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. नागपुरात RSS च्या विजयादशमी उत्सवाला शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमाने उपस्थीत होते. त्यावेळी माध्यमांशी संवाद साधताना हा दावा केला आहे. सेनेला आधीच मोठ्या प्रमाणत कमकुवत झाली आहे विधी मंडळात सेना कमजोर तर शिंदे गट वरचढ झाला आहे. बााळासाहेबांचा विचार घेऊन जाणारे आम्ही असून खरी शिवसेना आमची असल्याचा दावा देखील तुमाने यांनी केला. आज होणाऱ्या मेळाव्यात मुंबईतील आणि मराठवाड्यातील प्रत्येकी एक खासदार एकनाथ शिंदेच्या गटात येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

खासदार ठाकरे सोबत कोण?
फुटी नंतर उद्धव ठाकरे यांच्यासोबत गजानन कीर्तिकर (मुंबई उत्तर-पश्चिम), संजय जाधव (परभणी), ओमराजे निंबाळकर (उस्मानाबाद), अरविंद सावंत (मुंबई दक्षिण), राजन विचारे (ठाणे), विनायक राऊत (रत्नागिरी सिंधुदुर्ग), यांचा समावेश आहे. तर, दादरा नगर हवेलीच्या खासदार कलाबेन डेलकर या देखील सेनेत आहेत.

आमदार ठाकरे सोबत कोण ?
आदित्य ठाकरे (वरळी), सुनील प्रभ(दिंडोशी), रविंद्र वायकर, प्रकाश फातर्पेकर, संजय पोतनीस, नितीन देशमुख, वैभव नाईक, भास्कर जाधव, कैलास पाटील, सुनिल राऊत, रमेश कोरगावंकर, अजय चौधरी, राजन साळवी हे सद्या तरी ठाकरे सोबत आहेत.

शिंदे गटात आज कोण प्रवेश करणार ?
ठाकरे यांना सोडचीठी देत ठाकरेंना मोठा धक्का दिला. शिवसेनेतून शिंदे गटात जाणाऱ्या लोकप्रतिनिधींचा तूर्तास तरी ओघ बंद झाल्याचे चित्र आहे. मात्र, खासदार तुमाने यांच्या दाव्यानंतर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. तुमाने यांच्या दाव्यानुसार, एक खासदार मुंबई आणि मराठवाड्यातील आहे.

या दाव्यामुळे संशयाची सुई अधिक बाणेदार झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकर यांची भेट घेतली होती किर्तीकर गट प्रमुखांच्या मेळावा दिवशी देखील नाराज असल्याचे जाणवले. त्यानंतर शिवसेनेने किर्तीकर यांचा मुलगा अमोल किर्तीकर याला उपनेते पदी नियुक्त केले. खासदार किर्तीकर यांनी मुंबईतील गटप्रमुखांच्या मेळाव्यात काँग्रेस-राष्ट्रवादीसोबतची युती तोडावी असे वक्तव्य केले व ते गाजले होते.

मराठवाड्यातील खासदारांपैकी ओमराजराजे निंबाळकर यांनी उद्धव ठाकरे यांना साथ दिली आहे. त्यांनी ‘मातोश्री’वर इतर पक्षातील कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश घडवून आणला त्यामुळे त्यांच्याकडे संशयाने बघणे चुकीचे ठरेल. परभणीचे खासदार संजय जाधव हे शिवसेनेचे मराठवाड्यातील दुसरे मोठे खासदार आहेत. त्यामुळे शिंदे गटात गजानन किर्तीकर आणि संजय जाधव हे एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करू शकतात अशी दबक्या आवाजात चर्चा आज सुरू झाली आहे.

शिवसेनेच्या टॉप नेत्यांमध्ये गजानन किर्तीकर यांचे नाव आहे किर्तीकर हे शिवसेना कार्यकारणीत देखील आहेत. त्यामुळे त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यास निवडणूक आयोगासमोरील लढाईत शिंदे गटाला बळ मिळण्याची शक्यता आहे. मात्र, जाणकरांच्या मते खासदार किर्तीकर, जाधव हे शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता अतिशय कमी आहे. हे दोन्ही खासदार पक्षासोबत राहणार असल्याचे सध्या तरी चित्र असल्याचे अनेक विश्लेषक म्हनताय.

शिवसेनेतून शिंदे गटात कोणते पाच आमदार प्रवेश करणार याबाबत तर्क लावणे कठीण आहे सध्या उद्धव ठाकरे यांच्यासोबत असणाऱ्या आमदारांनी पक्षातील फुटीविरोधात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे कोणते आमदार प्रवेश करतील याकडे अनेकांचे लक्ष आहे.

शिंदे गटाचा दावा शिवसेनेने फेटाळला
शिवसेनेच्या प्रवक्त्या मनिष कायंदे यांनी म्हटले की, शिवसैनिक कुठेही गेला नाही तो ठाकरे सोबत आहे. ज्येष्ठ शिवसैनिकदेखील पक्षात असल्याचे त्यांनी सांगितले. पक्षात इनकमिंग सुरू असून नवीन कार्यकर्ते तयार होत आहेत. शिंदे गटाचा दावा बोगस ठरणार असल्याचे कायंदे यांनी सांगितले आहे


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here