खुशखबर स्वस्त झाले मोबाईल ! ; OPPO 64GB स्मार्टफोनवर 6 हजारांची सूट, 10,000 पेक्षा स्वस्त

0
29

फ्लिपकार्ट बिग दसरा सेल सुरू झाला असून ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मने यापूर्वी बिग बिलियन डेज सेलमध्ये डिस्काउंट ऑफरचा पाऊस पाडला होता. दसऱ्याच्या मुहूर्तावर नवीन सेलमध्ये सवलतींची कमतरता नाही. जर तुम्हाला नवीन स्मार्टफोन घ्यायचा असेल, तर तुम्हाला OPPO स्मार्टफोन्सवर उत्तम डील्स मिळत आहेत.

Oppo चा 64GB स्मार्टफोन खरेदी करण्यावर थेट 5,991 रुपयांची सूट मिळणार आहे. यासह, Oppo च्या 64GB स्मार्टफोनची किंमत 10,000 रुपयांहून अधिक स्वस्त झाली आहे. OPPO A12, OPPO A16E सारख्या स्मार्टफोनवर मोठ्या प्रमाणात सूट मिळत आहे.

स्वस्त स्मार्टफोन OPPO च्या अशा स्मार्टफोनबद्दल सांगत आहोत, ज्याच्या खरेदीवर थेट 10,031 रुपयांची बचत होईल. OPPO F19 Pro+ (128GB) एक प्रीमियम 5G स्मार्टफोन आहे, ज्याची वास्तविक किंमत 29,990 रुपये आहे. तथापि, OPPO F19 Pro + (128GB) स्मार्टफोन Rs 10,031 च्या सवलतीनंतर Flipkart वर फक्त Rs 19,959 मध्ये उपलब्ध आहे. आता बघूया 10,000 रुपयांपेक्षा स्वस्त असलेले OPPO स्मार्टफोन, ज्यावर डिस्काउंट मिळत आहे.

OPPO A16E (64GB)

Oppo A16E हा एक उत्तम स्मार्टफोन आहे, ज्यामध्ये 6.52-इंचाचा HD+ डिस्प्ले आहे. Oppo च्या A16E 64GB स्मार्टफोनची खरी किंमत 15,990 रुपये आहे. पण फ्लिपकार्टवरील बिग दसरा सेलमध्ये डिस्काउंट ऑफर्सचा बोलबाला आहे. त्यामुळे हा स्मार्टफोन 5,991 रुपयांच्या डिस्काउंटसह विकला जात आहे. युजर्स हा मोबाईल फ्लिपकार्टवरून फक्त 9,999 रुपयांना खरेदी करू शकतात.

OPPO A16k (64GB)

Oppo A16k हा आणखी एक दमदार स्मार्टफोन आहे, ज्यावर खूप मोठी सूट देण्यात आली आहे. यूजर्स हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवरून हजार रुपयांच्या डिस्काउंटसह खरेदी करू शकतात. OPPO A16k 64GB ची वास्तविक किंमत 15,990 रुपये आहे. पण युजर्स फ्लिपकार्टवरून फक्त 9,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकतात. यामुळे यूजर्स थेट ५,९९१ रुपयांची बचत करतील. हा स्मार्टफोन 6.52 इंच HD+ डिस्प्ले सह येतो.

OPPO A12 (32GB)

Oppo A12 हा 32GB स्मार्टफोन आहे, ज्यामध्ये 6.22-इंचाचा HD+ डिस्प्ले आहे. बाजारात त्याची खरी किंमत 10,990 रुपये आहे. तुम्ही ते फ्लिपकार्ट दसरा सेलमध्ये खरेदी केल्यास 1,000 रुपयांचा फायदा होईल. स्मार्टफोनसाठी यूजर्सना फक्त 9,990 रुपये मोजावे लागतील. हा स्मार्टफोन 3GB रॅम आणि 32GB अंतर्गत स्टोरेजसह येतो.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here