क्षितीज लोखंडे, द पाॅईंट नाऊ
संध्याकाळी ७ ते ९ वाजता ह्या वेळेत प्रत्येकाच्या घरी विविध टीव्ही मालिका लागल्या जातात. पण आजकाल बऱ्याच मालिकांमध्ये नवनवीन ट्विस्ट्स येत आहे. त्यात काही मालिका नुकत्याच सुरु झाल्या असल्या, तरी त्याच्या चर्चाही सध्या सोशल मिडीयावर सुरु आहेत.
शेवटी मालिका हे सर्व टीआरपीसाठी करत असल्याचे अनेकदा कबुल करत असले, पण मालिकेतील तोचतोचपणा किंवा एखाद्या पत्राला सतत चिडवणे हे बऱ्याच प्रेक्षकांना खटकत आहे. त्यामुळे अनेकदा ह्या मालिका ट्रोलर्सच्या निशाण्यावर बनतात.
हे जरी सत्य असले, तरी काही अशे मजेदार मीम्स आहेत. ते जोरदार व्हायरल होत आहे. त्यामुळेच हे मीम्स सध्या सोशल मिडीयावर ट्रेंड होत आहे. त्यातले काही मीम्सही खुद्द मालिकांदेखील आपल्या सोशल मिडिया हँडल्सवर शेअर करत आहे. पाहूया हे भन्नाट मीम्स !
ह्यात पहिले नाव घेतले जाईल, झी मराठीवर ‘तू चाल पुढं’ मालिका. ही मालिका नुकतीच सुरु झाली असून या मालिकेत मुख्य नायिकेची नणंद आपल्या वाहिनीला ऐश्वर्या रायच्या नावाने चिडवते. यावर एक भन्नाट मीम सध्या सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल होत आहे. या मालिकेत अभिनेत्री दीपा परब व धनश्री कडगावकर ह्या प्रमुख भूमिकेत आहे. (meme cr. @kshitijntr033)
https://www.instagram.com/p/Ci1v01mJyb3/?utm_source=ig_web_copy_link
तर स्टार प्रवाहवरील ‘सुख म्हणजे काय असतं’ ह्या मालिकेत सतत नवनवे वळण घेत असते. अनेकदा नायिकेवर अपघात होतो. मात्र, सारख्या सारख्या ह्याच गोष्टी दाखवल्या जात असल्यामुळे प्रेक्षकही आता याला कंटाळले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर अनेक नेटकरी यातून आपली नाराजी व्यक्त करत आहे. विशेष म्हणजे, ही मालिका टीआरपीमध्ये आहे. (meme cr. @lkk_marathi)
https://www.instagram.com/p/Ci-jzk8vu-g/?utm_source=ig_web_copy_link
तर ह्याच चॅनलवरील ‘आई कुठे काय करते’ ह्या मालिकेने तर कहरच केला आहे. ह्यातला नायक अनिरुद्ध आपल्या पहिल्या बायकोला सोडून जातो, आणि संजनाला आपल्या घरी राहायला देतो. पण संजना अनिरुद्धला मी आई होणार असल्याची बातमी देते. आणि ह्या सीनवर अनेक मीम व्हायरल झाले आहेत. (meme cr. @ppm_memesandvines)
https://www.instagram.com/p/Ci2augqp2Au/?utm_source=ig_web_copy_link
या व अश्या विविध मराठी टीव्ही मालिकांवरील अनेक भन्नाट मीम्स सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल होत आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम