या राजकीय नेत्याने व्यक्त केली बिग बॉसच्या घरात जाण्याची इच्छा ! म्हणाले…

0
26

मुंबई : येत्या २ ऑक्टोबरपासून बहुप्रतीक्षित शो ‘बिग बॉस मराठी’चा चौथा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याची घोषणा झाल्यानंतर प्रेक्षक ह्या शोची आतुरतेने वाट पाहत आहे. यंदाच्या घरात कोणते सदस्य असणार याबाबतही प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे.

अशातच एका राजकीय नेत्यानेही बिग बॉसमध्ये इच्छा बोलून दाखवली आहे. ती व्यक्ती दुसरी, तिसरी कोणी नसून चक्क ही इच्छा शिंदे गटाचे आमदार व पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली आहे. त्यांच्या या इच्छेमुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चेचा विषय बनला आहे.

यंदाच्या ‘बिग बॉस मराठी’चे सूत्रसंचालन प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर करत आहेत. नुकतीच या शोची पत्रकार परिषद पार पडली. यात महेश मांजरेकरांना राजकारणातील कोणती व्यक्ती बिग बॉसच्या घरात पाहायला आवडेल, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर महेश मांजरेकरांनी उत्तर देताना शिवसेना खासदार संजय राऊत, भाजप आमदार नितेश राणे, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांचा उल्लेख केला होता. तसेच, आमदार गुलाबराव पाटील यांची विनोदबुद्धी चांगली आहे. त्यामुळे त्यांनाही मला बिग बॉसच्या घरात पाहायला आवडेल, असेही मांजरेकर म्हणाले होते.

याबद्दल गुलाबराव पाटील यांना विचारले असता त्यांनी “आपल्याला जर बिग बॉसमध्ये बोलावले तर आपण नक्की जाऊ. बिग बॉसमध्ये जाणे ही माझ्यासाठी सोन्यासारखी संधी असेल, असे थेट वक्तव्य केले आहे. तसेच, अशी संधी कोणालाच मिळत नाही म्हणत त्यांनी जुन्या काळातील आठवणी ताज्या केल्या. मी कार्यक्रमात नाटक, गाणी यामध्ये कायम सहभाग घ्यायचो. त्यामुळे अशी संधी जर मला मिळाली तर मी निश्चितच जाईन, असे पाटील म्हणाले.

त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चेचा विषय बनला असला, तरी सेलिब्रिटी आणि सर्वसामान्य प्रेक्षकांप्रमाणेच राजकीय नेत्यांनाही बिग बॉसच्या घराची भुरळ पडली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here