नाशिक : नाशिक जिल्हयात सतत होत असलेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतमाल खराब झाला आहे. यामुळे अनेक भाजीपाल्यांच्या आवकमध्ये घट होऊन परिणामी अनेक भाज्यांना १०० रुपये किलो इतका भाव लागला आहे.
सध्या नवरात्रीचा काळ सुरु आहे, त्यामुळे अनेकांच्या घरी उपवासाचे पदार्थ बनवले जातात. पण या काळात भाज्यांना मागणी कमी असली, तरी ह्या काळात भाज्यांचे दर थेट शंभरीपार केल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. सध्या नाशिक बाजार समितीत कोथंबिरला २०० रूपये जुडी इतका भाव असून अनेक भाज्यांचा भावही जवळपास १०० ते १५० रूपये किलोपर्यंत जाऊन पोहचले आहेत.
सध्या नाशिकच्या बाजार समितीत कोथिंबीरला सर्वात जास्त भाव असून समितीत कोथिंबीरची जुडी थेट २०० रुपयांना विकली जात आहे. कारण, कोथिंबीरची आवक कमी असल्याने जिल्ह्यात कोथिंबिरीला चांगला भाव मिळत आहे. कोथिंबीर हा जवळपास सर्वच पदार्थांमध्ये वापरला जात असून ह्यालाच सर्वाधिक भाव असल्याने नागरिकांचे कंबरडे मोडले आहे.
त्याचप्रमाणे बाजार समितीत नियमित होत असलेल्या अन्य भाजीपालांत सध्या निम्मी आवक सुरू असल्याने ह्या भाज्यांचे दर कडाडलेले आहेत. जिल्ह्यात साधारणतः भाज्यांचे दर २० किंवा ३० रुपये पावशेरपासून सुरु होऊन ते १४० ते १६० रुपये किलोपर्यंत जात आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी तर पालेभाज्या मिळेनाशा झाल्या आहेत. पण जिथे या पालेभाज्या थोड्याफार मिळतात, तिथेही मात्र त्यांचे दर जास्त असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता रोजच्या जेवणात नेमके काय बनवायचे, असा प्रश्न गृहिणींना पडला आहे.
हे आहेत जिल्ह्यात भाज्यांचे दर :
कोथिंबीर – २०० रु. जुडी
लवंगी मिरची – १०० रु. किलो
शेवगा – ७० रु. किलो
कारले – ५० रु. किलो
काकडी – ५५० रु. कॅरेट
टोमॅटो – ११०० रु. कॅरेट
कोबी – २०० रु. कॅरेट
भोपळा – ३०० रु. कॅरेट
फ्लॉवर – १५० रु. कॅरेट
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम