
देवळा ; येथील मधुकर पांडुरंग मेतकर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन अजय मेतकर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (२७) रोजी संस्था कार्यालयात खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली .

संस्थेला आर्थिक वर्षां अखेर २२ लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला असून,सभासदांना ९ टक्के लाभांश देण्यात येणार असल्याची माहिती चेअरमन मेतकर यांनी यावेळी दिली . अहवाल वाचन व्यवस्थापक के एन देवरे यांनी केले .सर्व विषयांना मंजूरी देण्यात आली . इयत्ता १० व १२ वित अनुक्रमे ९० व ८५ टक्के गुण मिळालेल्या सभासद पाल्यांचा रोख बक्षीस देऊन गुणगौरव करण्यात आला .
याप्रसंगी संचालक दिलीप मेत कर ,विजय मेतकर ,राजेंद्र मेतकर , विष्णू शेवाळे ,आनंदा सोनवणे, संतोष शिंदे , संजय शिवदे , वैशाली शेवाळकर आदींसह कर्मचारी संदीप देवरे , ज्ञानेश्वर मेतकर आदी उपस्थित होते. सभेला बहुसंख्य सभासद उपस्थित होते . आभार दिलीप मेतकर यांनी मानले .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम