इगतपुरी : वाढदिवस म्हंटला की नको तो अनाठायी खर्च,रेव, पार्टी,डॉल्बी केक आणि धिंगाणा असं बरेच काही आपण सर्वजण नको ते बघतो अनुभवतो परंतु हीच वाढदिवसाची परिसीमा व्याख्या बदलविण्यासाठी इगतपुरी तालुक्यातील अधरवड गावातील शिक्षक भगवंत डोळस आणि त्यांच्या पत्नी अंगणवाडी सेविका मंगल डोळस यांनी सिम्बॉल ऑफ नॉलेज इंग्लिश मिडीयम स्कूलच्या शिक्षकांशी संवाद साधत शाळेचा वेळ मागवून प्रयत्न केले.
इगतपुरी तालुक्यातील तीर्थक्षेत्र असलेल्या आणि गोरगरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे माहेर घर समजल्या जाणाऱ्या सर्वतीर्थ टाकेद येथील सिम्बॉल ऑफ नॉलेज इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये सिनिअर ज्युनिअर के जी मध्ये शिकत असलेली डोळस कुटुंबियांची एकुलती एक कन्या कु.भाग्यश्री भगवंत डोळस हिच्या पाचव्या वाढदिवसाच्या निमित्ताने बुधवार ता.२८ दरम्यान सकाळी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना पेन,पेन्सिल, खोड लबर, शार्पनर ,चॉकलेट आदी साहित्याचे वाटप करत मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा केला.
या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या शालेय साहित्याचे वाटप कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार राम शिंदे उपस्थित होते. कु.भाग्यश्री हिला शाळेचे मुख्याध्यापक प्राध्यापक निलेश गायकवाड, शिक्षिका रुपाली लोहकरे,अनिता खतेले,एल लहामटे यांनी वही पेन गिफ्ट देऊन शाळेच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. डोळस कुटुंबीयांनी वाढदिवसाचा अनाठायी खर्च टाळत शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करत आपल्या कन्येचा वाढदिवस साजरा केला असा वाढदिवस स्तुत्य प्रेरणादायी उपक्रम समाजातील प्रत्येकाने साजरा करावा तेव्हाच आपला देश खऱ्या अर्थाने साक्षर आणि महासत्ता बनेल असे सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे यांनी यावेळी शुभेच्छा देतांना बोलतांना सांगितले.
या वाढदिवस कार्यक्रमाप्रसंगी पालक भगवंत डोळस,मंगल डोळस,सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे,मुख्याध्यापक निलेश गायकवाड, इगतपुरी तालुका राष्ट्रवादी युवती तालुका अध्यक्षा कु रुख्मिनीताई जोशी,शिक्षिका रुपाली लोहकरे,अनिता खतेले आदींसह शालेय विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम