देशाच्या विकासात नवोदयचा मोठा हातभार – उदयकुमार आहेर

0
40

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; देवळा मर्चंट बँकेचे कार्यकारी संचालक प्रशांत निकम यांच्या मुलगा समिरण निकम याचा नवोदय ला नंबर लागल्याने नवोदय विद्यालयाचे माजी विद्यार्थी व शिवसंग्रामचे प्रदेश अध्यक्ष उदयकुमार आहेर यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन समिरणचे अभिनंदन केले.

उदय आहेर नवोदय चे विद्यार्थी असल्याने त्यांनी नवोदय कुटुंबात समिरण चे स्वागत केले. आहेर पुढे म्हणाले की देवळा तालुक्यातील अनेक विद्यार्थी नवोदय परिवारात येत आहेत ही आनंदाची बाब आहे. देशाच्या विकासात नवोदयचा मोठा हातभार आहे. बुद्धिजीवी वर्ग यातून तयार होतोय.

तालुक्याच्या विकासासाठी ही आशादायी बाब आहे. शैक्षणिक दर्जा वाढण्यासाठी नवोदय सारखे शिक्षण व शिस्त गरजेची आहे. नवोदय विद्यालयाचे विद्यार्थी भविष्यात वेगळेपण सिद्ध करत असतात. ते प्रामाणिकपणे आयुष्य जगत असतात. देशाला दिशा देण्याचे काम नवोदयन करतात. असे गौरउद्गार आहेर यांनी काढले. यावेळी हर्षवर्धनराजे आहेर देखील उपस्थित होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here