बागलाण तालुक्यात आता नवीन ठिकाणी होणार उपबाजार

0
35

द पॉईंट नाऊ: बागलाण तालुक्यातील डांगसौदाणे येथे कृषी उत्पन्न बाजार समितीचा उपबाजार सुरू करण्यासाठी आवश्यक जमीन खरेदी झालेली आहे. आगामी काळात तातडीने विकासकामे पूर्णत्वास नेऊन उपबाजार सुरू करण्यासाठी सटाणा बाजार समितीत भाजीपाला लिलाव सुरू करण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्न करेल, असे आश्वासन सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पंकज ठाकरे यांनी दिले.

बाजार समितीचे सचिव भास्कर तांबे यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचन केले. त्यास तसेच विषयपत्रिकेतील विषयांना मंजुरी देण्यात आली. चर्चेत कैलास बोरसे, लालचंद सोनवणे, विकास सोनवणे, राहुल सोनवणे, प्रल्हाद पाटील, पांडुरंग सोनवणे, डॉ. प्रशांत पाटील, संजय पवार, आनंद सोनवणे, परशुराम अहिरे, भिकानाना सोनवणे, मीना भगवान, भालचंद्र गुंजाळ आदींनी सहभाग घेतला.

सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीची २०२१-२२ या आर्थिक वर्षातील वार्षिक सर्वसाधारण शनिवारी बाजार समिती आवारात झाली. याप्रसंगी ठाकरे बोलत होते. मंचावर संचालक केशव मांडवडे, नरेंद्र अहिरे, संजय सोनवणे, जयप्रकाश सोनवणे, प्रकाश देवरे, मधुकर देवरे, प्रभाकर रौदळ, संजय बिरारी, सरदारसिंह जाधव, मंगला सोनवणे, रत्नमाला सूर्यवंशी, तुकाराम देशमुख आदी उपस्थित होते.

यावेळी पंकज ठाकरे यांनी नागरिकांना आव्हान केले

डांगसौंदाणे उपबाजार समितीला विरोध केला जाऊ नये,
आदिवासी व शेतकरी हित डोळ्यासमोर ठेवून कामास गती द्यावी कांदा लिलावात सहभागी झालेल्या वाहनांना शिस्त लावण्यात यावी. रांगेत असलेल्या वाहनांचा लिलाव करावा, वशिलेबाजी करून नये. बाजार समितीने रासायनिक खते व औषध विक्री करू नये.
सटाणा येथील नव्या जागेत भाजीपाला मार्केट सुरू करण्यात यावे. स्वर्गीय दगाजी अजबा पाटील यांची जयंती साजरी करण्याची यावी.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here