देवळा : विज्ञानाच्या विद्यार्थ्यांनी समाजापर्यंत विज्ञान पोहोचवण्यासाठी विज्ञान प्रसारक म्हणून काम करावे जेणेकरून समाज प्रगत अन् जागरूक बनेल असा आशावाद हेमंत लागवणकर यांनी एक दिवसीय विज्ञान वारी या कार्यशाळेत व्यक्त केला.
देवळा येतील कर्मवीर रामरावजी आहेर कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय देवळा व मराठी विज्ञान परिषद मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवशीय शनिवारी विज्ञानवारी ही कार्यशाळा पार पडली. महाविद्यालयातील विज्ञानाच्या विद्यार्थी त्यांच्या सोयीच्या प्राथमिक किंवा माध्यमिक शाळेमध्ये शनिवारी जाऊन तेथील विद्यार्थ्यांना विज्ञान प्रयोगांचं काही साहित्यांचा वापर करून सोप्या भाषेमध्ये सादरीकरण करून दाखवतील व त्यामध्ये विद्यार्थ्यांना सुद्धा सामील करून घेतील.
विद्यार्थ्यांमध्ये तसेच समाजामध्ये विज्ञानभाव जागृत व्हावा त्यासाठी महाविद्यालयातील सर्व घटकांनी काम करावे अशी अपेक्षा अध्यक्षीय भाषणात प्राचार्य हितेंद्र आहेर यांनी व्यक्त केली. या कार्यशाळेचे आयोजन वृक्षप्रेमी वृक्षमित्र समुपदेशक डॉ. सुनील आहेर यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत डॉ. डी. के. आहेर व आभार प्रा. महेश वळवी यांनी केले. या कार्यशाळेत महाविद्यालयातील ४० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यशाळेचे आयोजन डॉ. डी. एम. सुरवसे व प्रा. राहुल पवार यांनी केले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम