शिंदे गटाला कोर्टाचा दणका ; सरवणकरांची याचिका फेटाळली

0
9

मुंबई: शिवसेनेचे दोन शकले पडल्यानंतर आज पुन्हा कोर्टात दोन्ही गट आमने सामने आले असून शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याच्या शिवसेनेच्या मागणीला हस्तक्षेप करणारी शिंदे गटाची याचिका हाय कोर्टाने फेटाळली असल्याने हा मोठा धक्का शिंदे गटाला बसला आहे. बंडखोर आमदार सदा सरवणकर यांनी ही याचिका दाखल केली होती. शिवसेना, शिंदे गट आणि मुंबई पालिकेचा कोर्टातील युक्तीवाद संपला असून काही वेळातच अंतिम निर्णय देण्यात येणार आहे.

आमदार सदा सरवणकर यांची हस्तक्षेप याचिका हायकोर्टाने फेटाळली असून यामुळे अंतिम निकाल काय असेल याकडे लक्ष लागून आहे. शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी करणारी आमदार सदा सरवणकर यांची हस्तक्षेप याचिका हायकोर्टाने फेटाळली. यामुळे एकनाथ शिंदे गटाला दणका बसला आहे. अंतिम निकालाची उत्सुकता लागली असून काही मिनिटात हा निर्णय समोर येणार आहे.

शिवसेना नेते अनिल परब हायकोर्टात उपस्थित असून शिवसेना साठी हा महत्वाचा विषय असल्याचे आधोरेखित होत आहे. शिवसेना नेते अनिल परब हायकोर्टात उपस्थित आहेत, दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर परवानगीबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी संपली असून निर्णयाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here