द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; देवळा तालुक्यातील रस्त्यांची परिस्थिती बिकट आहे. अगदी शहरापासून ते गावापर्यंत दयनीय अवस्था झाली आहे. देवळा – वाजगाव रस्त्यावर जुना मारुती लगत मोठी चारी असून ती वाहन चालकांच्या लक्षात येत नसल्याने अनेक वेळा छोटे अपघात झाले आहेत.
तहसील कार्यालया लगत असलेली ही रस्त्यावरील चारी अतिशय भयानक असून प्रशासनासह राजकीय पुढाऱ्यांचे मात्र दुर्लक्ष आहे. या ठिकाणी मोठा अपघात देखील घडू शकतो. डांबर खाली खचला असल्याने कोणाच्याही लक्षात येत नसून वाहन एकदम त्या खटीत आदळत असल्याने प्रत्यकाला मनस्ताप सहन करावा लागतोय.
प्रशासनाने व पुढाऱ्यांनी लक्ष घालून त्वरित हा खड्डा बुजवावा अशी मागणी वाहन चालकांनी केली आहे.
‘द पॉईंट नाऊ’ कडे अनेक प्रवाशांनी तक्रारी केल्यानंतर आम्ही जिल्हा परिषद सदस्य नूतन आहेर व राष्ट्रवादीचे युवक तालुकाध्यक्ष सुनील (गोटु आबा) आहेर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी लक्ष घालण्याचे आश्वासन दिले.
संबंधित अधिकाऱ्यांना माहिती दिली – सुनील आहेर (गोटु आबा)
तहसील समोर असलेला रस्ता बघितला आहे. त्या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सर्व माहिती संबंधित अधिकाऱ्यांना माहिती दिली असून मी स्वतः याबाबत पाठ पुरावा करणार आहे. यामुळे येत्या दोन दिवसात ही चारी बुजलेली असेल. तोपर्यंत नागरिकांनी वाहन चालवंतांना काळजी घ्यावी.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम