द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; देवळा वाखारी गटाच्या जिल्हा परिषद सदस्या डॉ. नूतन सुनील आहेर यांच्या विशेष प्रयत्नातून पारंपारिक ऊर्जा विकास योजने अंतर्गत सौर पथदीप बसविणे या कामाचे उद्घाटन दिनांक 29 सप्टेंबर रोजी वाजगाव येथे करण्यात आले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील (गोटूआबा) आहेर हे उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना डॉ. आहेर म्हणाल्या की विज बिल प्रश्नांच्या तांत्रिक अडचणीमुळे ग्रामपंचायतीचे पथदीप बंद असल्यामुळे गावातील नागरिकांना अंधाराला सामोरे जावे लागत असल्याने मा. पालक मंत्री छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या सहकार्याने अपारंपारिक ऊर्जा विकास योजनेअंतर्गत वाखारी गटातील २३ गावांना तब्बल ३९ सौर पथदीप मंजूर करण्यात यश आले व त्याचे काम सुरू होऊन गटातील गावे प्रकाशमय होतांना दिसत असल्याने समाधान होत आहे.
गटातील सुभाष नगर, वाजगाव, वडाळे येथील सौर पथदीप आन चे उद्घाटन यांच्या हस्ते करण्यात आले सदर पथदीप सौर ऊर्जा व विद्युत उर्जेवर चालणारे असल्याची माहिती त्यांनी दिली यावेळी उपसरपंच दीपक देवरे, संजय गायकवाड, महेंद्र देवरे, दसरथ पुरकर, एकनाथ बाबा आहेर, संज्योत देवरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम