‘गुजरातला खोके ,महाराष्ट्राला धोके’ म्हणत देवळा शहरात राष्ट्रवादीचे आंदोलन

0
8
देवळा / वेदांत फॉक्सकॉर्न प्रकल्प परत आणावा व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी आदी विविध मागण्याचे निवेदन तहसीलदार विजय सूर्यवंशी यांना देतांना तालुका अध्यक्ष यशवंत शिरसाठ समवेत योगेश आहेर ,पंडितराव निकम , सुनील आहेर ,दिलीप आहेर ,उषा बच्छाव ,जगदीश पवार आदी ( छाया - सोमनाथ जगताप )

देवळा ; वेदांत फॉक्सकॉर्न तसेच अति पावसाने नुकसान झालेलय शेती पिकांसाठी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी व वाढत्या चोरींना आळा बसविण्यात यावा आदी विविध मागण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तहसीलदार विजय सूर्यवंशी यांना निवेदन देण्यात आले .

देवळा वेदांत फॉक्सकॉर्न प्रकल्प परत आणावा व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी आदी विविध मागण्याचे निवेदन तहसीलदार विजय सूर्यवंशी यांना देतांना तालुका अध्यक्ष यशवंत शिरसाठ समवेत योगेश आहेर पंडितराव निकम सुनील आहेर दिलीप आहेर उषा बच्छाव जगदीश पवार आदी छाया सोमनाथ जगताप

निवेदनाचा आशय असा कि , महाराष्ट्रात लाखो कोटींचा उदयोग सुरू करून तरूणांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देणारा वेदांत फॉक्सकॉर्न प्रकल्प महाराष्ट्र सोडून गुजरातला गेल्याचे वृत्त म्हणजे राज्य सरकारचे अपयश आहे . यासाठी केंद्र सरकारकडे मध्यस्थी करून हा वेदांत फॉक्सकॉर्न प्रकल्प महाराष्ट्रात परत आणावा , पावसाने शेतपिंकाचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी कर्जबाजारी झाला असून , शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत .

शासनाने नुकसानीचे त्वरित पंचनामे करून शेतक – यांना ५० हजार रूपये प्रति एकरी नुकसान भरपाई म्हणून र मदत द्यावी , लंपी आजारामुळे शेतक – यांची गुरे मरत असून त्यांना सरकारने त्वरित भरपाई द्यावी . तसेच या आजाराची लस सरकारतर्फे मोफत उपलब्ध करून द्यावी, जिल्हा नियोजन मंडळाच्या मंजूर कामांना . मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिल्याने नाशिक जिल्हयातील सर्व कामे बंद पडल्याने नागरीकांचे हाल होत आहेत या सर्व कामांची स्थगिती तात्काळ उठवण्यात यावी व त्वरित पालकमंत्री नियुक्त करून नाशिक जिल्हयातील सार्वजनिक कामांना सुरुवात करावी, देवळा शहर व तालुकयातील ग्रामीण भागात भुरट्या चोरीचे प्रमाण वाढले असून , पोलिसांनी याला वेळीच आवर घालावा आदी मागण्याचा निवेदनात समावेश आहे .

यावेळी ” गुजरातला खोके ,महाराष्ट्राला धोके” अशा प्रकारच्या घोषणा देऊन राज्य सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला . याप्रसंगी प्रांतिक सदस्य योगेश आहेर ,जेष्ठ नेते पंडितराव निकम , तालुका अध्यक्ष यशवंत शिरसाठ , महिला तालुका अध्यक्षा उषाताई बच्छाव , वनिता शिंदे , हेमलता खैरणार , युवक तालुका अध्यक्ष सुनील आहेर , शहर अध्यक्ष दिलीप आहेर , जिल्हा सरचिटणीस जगदीश पवार , महेंद्र आहेर , पी डी निकम , नगरसेवक संतोष शिंदे , कुबेर जाधव , संजय सावळे ,चिंतामण आहेर , दीपक निकम , श्रीकांत अहिरराव , डॉ कृष्णा अहिरे , राजेश आहेर , तकदीर कापडणीस , सचिन सूर्यवंशी , सतीश सूर्यवंशी ,दत्तू आहेर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here