मालेगाव येथील नाळे बंधारा फुटल्याने पिकांचे नुकसान

0
25

 

द पॉईंट नाऊ: तालुका मालेगावात नाळे येथील झालेल्या अतिवृष्टीमुळे रात्री साडे अकरा वाजण्याच्या दरम्यान बंधारा फुटल्याने परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान होऊन दहा ते बारा विहिरींमध्ये पाण्याबरोबरच गाळ साचल्याने विहिरी बुजल्या गेल्याने शेतक-यांचे हाल झाले. शासनाने त्वरित झालेल्या नुकसानाचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नाळे गावचे सरपंच सचिन साळुंके यांनी केली. मागील तीन ते चार दिवसांपासून शहरासह तालुक्यात पावसाची संततधार सुरू आहे.
जरी मंगळवारी पावसाने विश्रांती घेतली परंतु. १९७२ मध्ये बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीत पाणीच पाणी होऊन संचलित क्षेत्र झाले. सोमवारी सायंकाळी सहा वाजल्यापासून नाळे परिसरात जोरदार पाऊस सुरू होता. बंधाऱ्यावरून दोन ते चार फूट पाणी वाहत होते. त्यामुळे बंधाऱ्याला खच पडून रात्री जोरदार वेगात बंधारा फुटून पाणी वाहू लागले. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात पाणीच पाणी झाले. यावेळी शेतात असलेल्या बाजरी, कापूस, मका, कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुमारे बारा विहिरी गाळणीने भरून बुजल्या गेल्या, या प्रसंगाने शेतकरी पुन्हा आल्यावर पडला आहे. बंधारा परिसरातील सुमारे २०० एकर शेतीचे नुकसान झालेल्याची माहिती आहे.
शासनाने तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली साडे अकरा वाजण्याच्या सुमारास आहे.

प्रांताधिकारी विजयानंद शर्मा हे उपविभागीय जलसंधारण विभागाच्या अधिकारी अंकिता वाघमारे यांच्या बरोबर महसूल अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी करून पंचनामा केला. यावेळी सरपंच साळुंके, संतोष शिरसाठ, नारायणे लामखेडे, देवा लामखेडे, गोकुळ कोते, मधुकर को रवी सरोदे, ज्ञानेश्वर चिकणे, युवराज साळुंके आदी यांचीही उपस्थिती होती.

संगमेश्वर: येथेही अनेक वर्षांनंतर मोसम नदी यंदा पहिल्यांदाच दुथडी भरुन वाहू लागल्याने मालेगाव येथील नागरिक सुखावले आहेत. यावर्षी सर्वत्र चांगला पाऊस पडत असताना मालेगाव परिसरातही पावसाने चांगलाच जोर धरला आहे. तीन-चार महिन्यांपासून कोसळणाऱ्या पावसाने नदी नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. मोसम नदीही भरभरून वाहू लागली आहे.
मोसम नदीला पूर येऊन परिणामी मालेगावच्या पूर्व पश्चिम भागाला जोडणारा सांडवा पूल अनेकवेळा पाण्याखाली गेला. त्यामुळे येथील वाहतूक ठप्प होण्याचा प्रसंगही आला. मात्र मोसम नदीला आलेल्या पूर पाण्याने नदीचे पात्र आयतेच स्वच्छ झाले. नदीत सोडले जाणारे गटारीचे पाणी, गाळ, कचरा वाहून जाण्यास मोठी मदतच झाली.
पुराच्या पाण्याने परिसरातील विहिरी, कूपनलिका यांना चांगलेच पाणी उतरले आहे. जमिनीतील पाण्याची पातळी वाढल्याने त्याचा उपयोग येणाऱ्या काळात शेतीसाठी होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. हरणबारी धरणातूनही दोन-तीन वेळा विसर्ग करावा लागला. त्यामुळे शेतीसाठी उपयुक्त पाण्याची चिंता मिटल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here