सीए फाउंडेशन परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या कधी होणार परीक्षा ?

0
43

दिल्ली – चार्टर्ड अकाउंटंटची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स म्हणजेच आयसीएआयने येत्या डिसेंबरमध्ये होणाऱ्या सीए फाउंडेशन परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

आयसीएआयने जाहीर केलेल्या अधिकृत सूचनेनुसार, सीए फाउंडेशन डिसेंबर सत्रासाठी १४ ते २० डिसेंबर २०२२ या काळात ही परीक्षा घेतली जाणार असून १४ सप्टेंबरपासून संस्थेच्या अधिकृत वेबसाईट icai.org वर इच्छुक विद्यार्थी ऑनलाइन अर्ज करू शकणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ ऑक्टोबर असून विलंब शुल्कासह ९ ऑक्टोबरपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. तसेच, ८ ते १३ ऑक्टोबर दरम्यान उमेदवारी अर्जातील दुरुस्तीची विंडो सुरू केली जाईल.

भारतीय उमेदवारांना १५०० रुपये नोंदणी शुल्क म्हणून भरावे लागेल. तर विदेशी उमेदवारांना नोंदणी शुल्क म्हणून ३२५ युएस डॉलर आणि भूतान व काठमांडू केंद्रांसाठी २२०० रुपये आकारले जातील. ६०० रुपये किंवा १० युएस डॉलर इतका विलंब शुल्क असणार आहे.

यावर्षीची सीए फाउंडेशन परीक्षा देशभरातील २९ शहरांमध्ये आणि विदेशातील ८ अश्या २७७ परीक्षाकेंद्रांवर घेतली जाणार आहे. विदेशातील शहरांमध्ये अबुधाबी, दुबई, काठमांडू, बहरीन, थिम्पू, मस्कत, दोहा आणि कुवेत यांचा समावेश आहे. परीक्षेची वेळ भारतात दुपारी २ पासून सुरु होतील, तर इतर देशात त्यांच्या स्थानिक वेळेनुसार सुरु होतील. परीक्षेशी संबंधित अधिक माहितीसाठी, आयसीएआयच्या वेबसाइटला तुम्ही भेट देऊ शकता.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here