लंडन – महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर त्यांचे सुपुत्र किंग चार्ल्स तिसरे हे ग्रेट ब्रिटनचे नवे राजे बनले आहे. लंडनमध्ये आज त्यांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला.
लंडनमधील सेंट जेम्स पॅलेस येथे एका ऐतिहासिक कार्यक्रमात किंग चार्ल्स तिसरे यांना अधिकृतरित्या ब्रिटनचे महाराज म्हणून जाहीर करण्यात आले व त्यांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला. सोहळ्याला नव्या राणी कॅमिला, वेल्सचे राजकुमार विलियम, पंतप्रधान लिझ ट्रस व राजघराण्यातील सदस्य, मंत्री, संसद सदस्य, अधिकारी आदि उपस्थित होते. यावेळी प्रिन्स चार्ल्स, पेनी मॉरडंट आणि पंतप्रधान लिझ ट्रस यांनी जाहीरनाम्यावर स्वाक्षरी केली.
The United Kingdom | #KingCharlesIII proclaimed Britain's new monarch at the Accession Council at St James's Palace in London.
Queen Consort Camilla, Prince of Wales William, PM Liz Truss and others in attendance.
(Source: Reuters) pic.twitter.com/tZwQ5SOuH3
— ANI (@ANI) September 10, 2022
यावेळी किंग चार्ल्स तिसरे यांनी कार्यक्रमात प्रिव्ही कौन्सिलला संबोधित करताना म्हटले, की एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबाची, ब्रिटनची आणि जगाची कधीही न भरुन निघणारी हानी झाली आहे. एलिझाबेथ द्वितीय यांनी जीवनभर प्रेम आणि निस्वार्थ सेवेचे उदाहरण दाखवून दिले. आईच्या शासन काळात समर्पण आणि निष्ठेचा अंतर्भाव होता, असे म्हणताना पत्नीकडून आपल्याला सातत्याने मिळणाऱ्या समर्थनामुळे प्रोत्साहित असल्याचेही ते म्हणाले.
His Majesty The King gives a personal declaration at today’s Accession Council, where he was formally proclaimed King Charles III.
⚫ https://t.co/lZ6yrT9Y0Y pic.twitter.com/phalp3gxTo
— The Royal Family (@RoyalFamily) September 10, 2022
गुरुवारी महाराणींच्या निधनानंतर ब्रिटीश परंपरेनुसार २४ तासात राज्याभिषेक करण्यासाठी एक परिषद बोलावली जाते. मात्र महाराणींच्या निधनाची घोषणा रात्री उशिरा झाल्यामुळे चार्ल्स तिसरे यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन आज करण्यात आले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम