दिल्ली – ऑलिम्पिक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्राची पुन्हा एकदा शानदार कामगिरी करत अॅथलेटिक्स डायमंड लीग स्पर्धेचे ऐतिहासिक विजेतेपद पटकावले आहे. ही स्पर्धा जिंकणारा नीरज पहिला भारतीय बनला आहे.
88.44m!
Just a few weeks after his first ever #DiamondLeague win, @Neeraj_chopra1 claims his first ever Diamond Trophy!#ZurichDL🇨🇭#DLFinal💎
📷 @matthewquine pic.twitter.com/bwf3kzpMtc— Wanda Diamond League (@Diamond_League) September 8, 2022
स्वित्झर्लंडच्या झुरिचमध्ये पार पडलेल्या डायमंड लीगच्या भालाफेक अंतिम फेरीत २४ वर्षीय नीरजने ८८.४४ मीटर भालाफेक करुन आपल्या कारकिर्दीतील नवा विजय नोंदवला आहे. विशेष म्हणजे, त्याचा पहिला प्रयत्न अयशस्वी ठरूनही दुसऱ्या प्रयत्नात शानदार भालाफेक करत पुनरागमन केले आणि डायमंड ट्रॉफीवर नाव कोरले.
चेक रिपब्लिकचा जेकब वडलेच ८६.९४ मीटरच्या थ्रोसह दुसरा आणि जर्मनीचा ज्युलियन वेबर (८३.७३) स्पर्धेत तिसरा आला. नीरजने यापूर्वी २०२१ ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक, २०१८ आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक, २०१८ राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक, २०२२ जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक जिंकले आहे. या चॅम्पियनशिपनंतर नीरजची डायमंड लीगची ट्रॉफी जिंकण्याची मनापासून इच्छा होती, जी ह्या स्पर्धेच्या विजेतेपदाने आता पूर्ण झाली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम