दिल्ली – नुकतीच एक दुःखद बातमी आली आहे ब्रिटनमधून. ग्रेट ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे आज वृद्धापकाळाने वयाच्या ९६ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे ब्रिटन शोकसागरात बुडाला आहे.
स्कॉटलंडमधील बाल्मोरल कॅसल येथे त्यांनी अंतिम श्वास घेतला. यावेळी राजपरिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते. ब्रिटीश राजघराण्याकडून त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा देण्यात आला असून त्यांच्या निधनानंतर ब्रिटनमध्ये शासकीय दुखवटा जाहीर झाला आहे.
The Queen, Britain's longest-serving monarch, has passed away at the age of 96 after 70 years on the thronehttps://t.co/fHULhzXNRN pic.twitter.com/0l4b7tJ7NR
— The Telegraph (@Telegraph) September 8, 2022
ब्रिटनच्या महाराणींचा अल्पपरीचय
एलिझाबेथ द्वितीय यांचा जन्म लंडनमध्ये २१ एप्रिल १९२६ रोजी झाला. त्यांचे शिक्षण घरातच झाले. एलिझाबेथ यांचे वडील जॉर्ज यांचे १९५२ मध्ये निधन झाले, त्यानंतर एलिझाबेथ यांना ब्रिटनची महाराणी म्हणून घोषित करण्यात आले. तब्बल सात दशके त्या ग्रेट ब्रिटनच्या महाराणी होत्या. केवळ ब्रिटनच नव्हे, तर त्या कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, जमैका, बार्बाडोस, बहामास, ग्रेनेडा, पापुआ न्यू गिनी, सॉलोमन बेट समूह, तुवालू, सेंट लुसिया, सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स, बेलिझ, ॲंटिगा आणि बार्बुडा, व सेंट किट्स आणि नेव्हिस आदि १६ देशांच्या महाराणी होत्या. एलिझाबेथ द्वितीय या जगात सर्वाधिक काळ सत्ता हाकणाऱ्या महाराणी होत्या.
एलिझाबेथ यांचा विवाह प्रिन्स फिलीप यांच्यासोबत १९४७ मध्ये झाला. मागील वर्षी, ९ एप्रिल मध्ये वयाच्या ९९ व्या वर्षी त्यांचे निधन झाले होते. त्यांच्या पश्चात चार अपत्ये, सूना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर आता प्रिन्स चार्ल्स हे ब्रिटनच्या गादीवर बसणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासह जगभरातल्या अनेक नेत्यांनी ब्रिटनच्या महाराणींना श्रद्धांजली वाहिली.
Her Majesty Queen Elizabeth II will be remembered as a stalwart of our times. She provided inspiring leadership to her nation and people. She personified dignity and decency in public life. Pained by her demise. My thoughts are with her family and people of UK in this sad hour.
— Narendra Modi (@narendramodi) September 8, 2022
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम