मुंबई – आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने (आयसीसी) येत्या ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियात रंगणाऱ्या टी२० विश्वचषक स्पर्धेपूर्वी खेळल्या जाणाऱ्या सराव सामन्यांचे वेळापत्रक आज जाहीर केले. दोन वेळची विश्वविजेता वेस्ट इंडीज आणि युएई यांच्यात पहिला सराव सामना खेळला जाणार आहे.
https://www.instagram.com/p/CiPXYuGjGXf/?utm_source=ig_web_copy_link
१० ऑक्टोबर ते १९ ऑक्टोबरपर्यंत हे सराव सामने खेळले जातील. ज्यात सर्व संघ खेळणार असून प्रत्येक संघाला दोन सराव सामने खेळण्याची संधी मिळणार आहे. भारताचा विचार केला, तर १७ ऑक्टोबरला यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्ध तर १९ ऑक्टोबरला गत उपविजेता न्यूझीलंडविरुद्ध सराव सामने खेळणार आहे.
मुख्य स्पर्धा मात्र १६ ऑक्टोबरपासून सुरु होणार असून ज्यात विश्वविजेते वेस्ट इंडिज व श्रीलंका पात्र झालेल्या इतर संघांसोबत पहिला राउंड खेळतील. दोन्ही गटातील अव्वल २ संघ सुपर १२ फेरीत पोहोचतील.
सुपर १२ फेरी २२ ऑक्टोबरपासून सुरु होणार असून २३ तारखेला भारत-पाकिस्तान सामना होणार आहे. तर अंतिम सामना १३ नोव्हेंबरला होईल.
पहिला राउंड
अ गट – नामिबिया, श्रीलंका, संयुक्त अरब अमिराती आणि नेदरलँड.
ब गट – आयर्लंड, स्कॉटलंड, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे.
सुपर १२ फेरी
गट १ – अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, अ गटातील विजेता आणि ब गटातील उपविजेता.
गट २ – बांगलादेश, भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, अ गटातील उपविजेता आणि ब गटातील विजेता.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम