दहशतवादी याकुब मेमनच्या कबरीवर मुंबई पोलिसांची कारवाई

0
40

मुंबई – मुंबई पोलिसांनी बॉम्बस्फोटातील दोषी दहशतवादी याकुब मेमनच्या कबरीवर कारवाई केली आहे.

दक्षिण मुंबईतल्या मरिन लाईन्स परिसरातील बडा कब्रस्तानात दहशतवादी मेमनची कबर आहे. कोविड काळात या कबरीचे सुशोभीकरण करण्यात आले होते. ज्यात मार्बल्स आणि एलईडी लाईट्सह फुलांच्या पाकळ्यांनी ही कबर सजवण्यात आली होती.

मात्र यावरून मोठा वाद होताच अखेर मुंबई पोलिसांनी कबरीवरील एलईडी लाईट्स काढून टाकल्या आहेत. ही जागा ‘बेरियल वक्फ बोर्डा’च्या अख्यत्यारीत येत आहे. असे म्हटले जाते, की ‘शब-ए-बारात’ निमित्त त्याच्या कबरीवर एलईडी लाईट्स लावली होती.

कोण होता याकुब मेमन ?

याकुब मेमन हा १९९३ मध्ये झालेल्या मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी. बॉम्बस्फोटात त्याचा आर्थिक सहभाग असल्याचे आढळल्यानंतर न्यायालयाने याकुबला दोषी ठरवले होते व ३० जुलै २०१५ रोजी नागपूर कारागृहात याकुबला फाशी देण्यात आली होती. आणि त्याचा मृतदेह दक्षिण मुंबईतील बडा कब्रस्तानमध्ये दफन करण्यात आला होता.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here