सोमनाथ जगताप
देवळा ; सद्रक्षणाय खलनिग्रणाय असं ब्रीद वाक्य असलेल्या पोलीस दलाला कायदा सुवस्था सुस्थित राखण्यात खांद्याला खांदा लावून गावाखेड्यात काम करणारे पोलीस पाटील गेल्या सहा महिन्यांपासून मानधनापासून वंचित आहेत .
यामुळे त्यांची बिन पगारी आणि फुल्ल अधिकारी अशी गत झाली आहे . पोलीस पाटील संघटनेकडून यामुळे तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली असून ,सरकारने याची तात्काळ दखल घेऊन मानधन वर्ग करावे ,अशी मागणी देवळा तालुका पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष योगेश गुंजाळ यांनी केली आहे. सद्रक्षणाय खलनिग्रणाय असं ब्रीद वाक्य असलेल्या पोलीस दलाला कायदा सुवस्था सुस्थित राखण्यात खांद्याला खांदा लावून गावाखेड्यात काम करणारे पोलीस पाटील गेल्या सहा महिन्यांपासून मानधनापासून वंचित आहेत.
यामुळे गावकामागर पोलीस पाटलांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. कोणत्याही सण उत्सवात तसेच गाव तंटामुक्त कसे राहील व कोणत्याही निवडणुकीत अनुचित प्रकार घडू नये म्हणून सहकार्य करणे यासाठी पोलीस पाटील प्रामाणिक पणे प्रयत्न करीत आहेत. मात्र त्याना शासनाने ठरवून दिलेले मानधन वेळेवर मिळत नसल्याने त्यांच्यावर आर्थिक संकटाचा सामना करण्याची वेळ आली आहे. गेल्या सहा महिन्यापासूनच मानधन मिळत नसल्याने तीव्र नाराजीचा सूर उमटला असून, शासनाने याची तात्काळ दखल घेऊन मानधन त्यांच्या खात्यात वर्ग करावे, अशी मागणी शेवटी तालुका अध्यक्ष योगेश गुंजाळ यांनी केली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम