हिंदू संस्कृतीत ‘त्यागाला’ अन ‘दानाला’ अनन्यसाधारण महत्व – इंदुरीकर

0
52
भूमीदान केली त्याबद्दल जिभाऊ खैर यांना आशीर्वाद देत सन्मान करतांना महामण्डलेश्वर स्वामी सोमेश्वरानन्द सरस्वतीजी महाराज, निवृत्ती महाराज इंदोरीकर, संजय नाना धोंडगे आदी (छाया -सोमनाथ जगताप )

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : हिंदू संस्कृतीत त्यागाला अन दानाला अनन्यसाधारण महत्व आहे. माता-पिता व गुरू यांना देवास्वरूप मानले जाते. रंजले-गांजलेले व दीनदुबळे यांना जवळ घेत त्यांची सेवा करणे हीच खरी ईश्वरप्राप्ती होय असा उपदेश समाजप्रबोधनकार ह भ प निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांनी येथे केला.

शुक्रवार (दि.२४) रोजी मकरंदवाडी ता.देवळा येथील जिभाऊ फुला खैर यांनी मातृ-पितृ पुजनानिमित्त आईच्या ग्रंथतुला कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पंचायती आखाडा श्रीनिरंजनीचे श्रीश्री १००८ महामण्डलेश्वर स्वामी सोमेश्वरानन्द सरस्वतीजी महाराज उपस्थित होते.

भूमीदान केली त्याबद्दल जिभाऊ खैर यांना आशीर्वाद देत सन्मान करतांना महामण्डलेश्वर स्वामी सोमेश्वरानन्द सरस्वतीजी महाराज, निवृत्ती महाराज इंदोरीकर, संजय नाना धोंडगे आदी (छाया -सोमनाथ जगताप )

या दरम्यान झालेल्या सोहळ्यात खैर यांनी आपल्या मालकीची अडीच एकर जमीन बेझे (ता.त्र्यंबकेश्वर) येथील श्रीराम शक्तीपीठ देवस्थानला दान केली. या जमिनीवर अथवा तिच्या मोबदल्यात ज्ञानमंदीर, वृद्धाश्रम, आधाराश्रम, अनाथालय, गोशाळा यांसह अध्यात्मिक केंद्र उभे करण्याचे नियोजन असल्याचे श्री.खैर यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवृत्तीनाथ महाराज संस्थानचे माजी अध्यक्ष ह भ प संजय नाना धोंडगे यांनी केले. तर सोमेश्वरानंद महाराज यांनी आशीर्वचन दिले.

यावेळी श्रीनाथानंद सरस्वती महाराज, सिद्धेश्वरानन्द सरस्वती महाराज, सुदर्शनानंद सरस्वती महाराज, विश्वेश्वरानन्द सरस्वती महाराज यांच्यासह अध्यात्मिक, धार्मिक व वारकरी क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. राहुल महाराज साळुंके, बाकेराव मामा आदींनी संयोजन केले. रविंद्र ननावरे यांनी सूत्रसंचालन केले. कीर्तन सोहळा पाहण्यासाठी या परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here