मुंबई – भारताचा माजी फलंदाज सुरेश रैनाने आज सर्व प्रकारच्या स्पर्धांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. यासह तो आता आयपीएलमधेही खेळणार नाही.
It has been an absolute honour to represent my country & state UP. I would like to announce my retirement from all formats of Cricket. I would like to thank @BCCI, @UPCACricket, @ChennaiIPL, @ShuklaRajiv sir & all my fans for their support and unwavering faith in my abilities 🇮🇳
— Suresh Raina🇮🇳 (@ImRaina) September 6, 2022
त्याने आपल्या ट्वीटमध्ये म्हटले की, मला देशाचे व माझ्या उत्तरप्रदेश राज्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली, याचा अभिमान आहे. मी क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर करत आहोत. मी यासाठी बीसीसीआय, उत्तरप्रदेश क्रिकेट संघटना, चेन्नई सुपर किंग्ज, राजीव शुक्ला व सर्व चाहत्यांचे आभार मानू इच्छितो.
सुरेश रैनाची कारकीर्द
सुरेश रैनाने २००५ मध्ये आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली होती, तत्पूर्वी तो २००२ पासून स्थानिक क्रिकेट खेळायचा. रैनाने १८ कसोटी, २२६ एकदिवसीय आणि ७८ टी-२० सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच तो आयपीएल टीम चेन्नई सुपर किंग्जचा महत्त्वाचा भाग होता. रैनाने १५ ऑगस्ट २०२० रोजी महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर लगेचच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम