मोदी सरकार दिल्लीतील ऐतिहासिक रस्त्याचे नाव बदलणार; हे नाव असणार…

0
15

नवी दिल्ली – केंद्रातील मोदी सरकारने आताच एक मोठे पाऊल उचलत राजपथ आणि सेंट्रल व्हिस्टा लॉनचे नाव बदलण्याचा निर्णय घेतलेला आहे.

केंद्रातल्या सूत्रांनी सांगितले की, एनडीएमसीने राजपथ आणि सेंट्रल व्हिस्टाच्या लॉनचे नामकरण करण्यासाठी ७ सप्टेंबर रोजी विशेष बैठक बोलावली आहे. त्यात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्यापासून राष्ट्रपती भवनापर्यंतचा संपूर्ण रस्ता व परिसर आता “कर्तव्यपथ” ह्या नावाने ओळखला जाण्याचा निर्णय घेणार आहे. आता राज्यकर्ते आणि प्रजेचे युग संपले आहे, असा संदेश मोदी सरकारला या निर्णयाने द्यायचा आहे.

यापूर्वी मोदी सरकारने पंतप्रधानांचे निवासस्थान असलेल्या रेसकोर्स रोडचे नाव “लोककल्याण मार्ग” असे नामकरण केले होते.

त्यासोबतच सेंट्रल व्हिस्टा अव्हेन्यू लवकरच उद्घाटनासाठी सज्ज असून याचा फर्स्ट लुक सोमवारी लोकांसमोर आला. अव्हेन्यूचे जबरदस्त फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. राजपथजवळील सेंट्रल व्हिस्टा अव्हेन्यूमध्ये राज्यनिहाय खाद्यपदार्थांचे स्टॉल, चहूबाजूंनी हिरवळ असलेले लाल ग्रॅनाइट वॉकवे, व्हेंडिंग झोन, पार्किंग लॉट आणि चोवीस तास सुरक्षा असेल. सेंट्रल व्हिस्टा अव्हेन्यू हा सरकारच्या महत्त्वाकांक्षी सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पाचा एक भाग आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here