हैदराबाद – जगभरात ‘पुष्पा’ चित्रपटाने सर्वांना वेड लावणारा साऊथचा आयकॉन स्टार अल्लू अर्जुन बाप्पाच्या विसर्जनात आपल्या मुलीसह थिरकला.
https://www.instagram.com/reel/CiINMa0JMBq/?igshid=YmMyMTA2M2Y=
स्वतः अल्लूने इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. तो आपली मुलगी अरहा हिच्यासोबत आहे. अल्लू अर्जुन हैदराबादेतील एका मंडळाच्या बाप्पाच्या विसर्जन सोहळ्यात सहभागी झाला. तो आपल्या मुलीसह गाडीतून उतरत बाप्पाचे दर्शन घेतले. मंडळाच्या कार्यकर्त्यांसह त्याने ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष केला. यावेळी अल्लूची मुलगीही वडिलांसोबत थिरकली. यावेळी कार्यकर्त्यांनी अल्लूचा सत्कार केला आणि चाहत्यांना अभिवादन केले.
साऊथचा सुपरस्टार्सपैकी एक अल्लूचा ‘पुष्पा २ : द रूल’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत असून नुकतंच चित्रपटाचा पूजा सोहळा पार पडला असून हा चित्रपट पुढच्या वर्षी रिलीज होणार आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम