विंचूर-लासलगाव रस्त्यावर रिक्षा हायवाच्या भीषण अपघातात पाच ठार

0
51

प्रसाद बैरागी
द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; विंचूर-लासलगाव रस्त्यावरील मंजुळा पॅलेसजवळ आज (ता.२५) रोजी सायंकाळी साडे सहावाजेच्या दरम्यान रिक्षा व हायवा ट्रक यांच्यात अपघात होऊन रिक्षामधील रिक्षा चालक व चार प्रवासी असे पाच जण ठार झाले.यापैकी चार जागीच ठार तर एक अत्यवस्थ होता.त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

शनिवार ता.२५ रोजी सायंकाळी साडे सहा वाजेच्या दरम्यान लासलगाकडून प्रवाशांची भरलेली रिक्षा क्र.एम एच १५ वाय ४४६१ विंचूरच्या दिशेने मंजूळा पॅलेसजवळ येत असतांना.विंचूरकडून लासलगावच्या दिशेने जात असलेला हायवा ट्रक क्र.एम. एच.०६ झेड ७५७६ यांच्यात भिषण अपघात होवून रिक्षा चालक सुहास मनोहर निकाळे (वय ४०) रा.विंचूर तसेच प्रवाशी विठ्ठल बाजिराव भापकर वय ६५ रा.लोणी ब्रु ,ता.रहाता, बाळासाहेब बालाजी नांगरे वय ६० रा. प्रवरा कॉलणी ,लोणी ब्रु., रतन सुकदेव गांगुर्डे वय ४० रा. विंचूर, किसन गोविंदद‍ास बैरागी व ६० रा. धारणगाव खडक आदी प्रवाशी जागीच ठार झाले.मृतांना लासलगाव ग्रामिण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

घटनास्थळी लासलगाव पोलीस ठाण्याचे सहा.पो.निरी.राहूल वाघ ,पो.उपनिरी.रामकृष्ण सोनवणे,पो.हवा.राजेंद्र घुगे, योगेश शिंदे, कैलास मानकर दाखल होवून हायवा ट्रक चालकास पोलीसांनी ताब्यात घेतले. पुढील तपास लासलगाव पोलीस तपास करत आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here