मेष – आज आपला दिवस भाग्यदायक आहे. बिघडलेले काम पुन्हां सुरळीत करण्यासाठी आज योग्य दिवस आहे. बेरोजगार लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. जोडीदाराचा सहयोग प्राप्त होईल. व्यापारी लोकांसाठी ही दिवस चांगला आहे. शुभ अंक 7 शुभ रंग गुलाबी.
वृषभ- आत्मविश्वास वाढेल. आकस्मित धन लाभ होऊ शकतो. अचानकपणे कुठलाही निर्णय घ्यावा लागेल. दिवस व्यस्थ असेल, व्यापारी लोकांना दिवस चांगला आहे कुठलीही गुंतवणूक करतांना योग्य व्यक्तीचा सल्ला घ्यावा. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी.
शुभ अंक 5, शुभ रंग हिरवा.
मिथुन- परिस्थिती आपल्या अनुकूल आहे. कुठलाही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात घाई करू नये. यशदायी दिवस असेल शुभ असेल. महत्वपूर्ण कार्य पूर्ण होऊ शकते. अविवाहित जातकांना विवाह प्रस्ताव येऊ शकतात. वाहन चालवताना सावधानीपूर्वक चालवावे. व्यापारी वर्गासाठी दिवस शुभ आहे गुंतवणूक करू शकता.
शुभ अंक 8 शुभ रंग बदामी.
कर्क- आपल्याला ज्याच्यावर विश्वास आहे अश्या व्यक्ती कडून विश्वासघात संभवतो.कामे बिघडू शकतात. आज आर्थिक गुंतवणूक करणे टाळावे. अनावश्यक खर्च टाळावे, जोडीदाराकडून प्रेम सन्मान प्राप्त होईल. व्यापारी वर्गासाठी दिवस ठीकठाक म्हणता येईल. कफ खोकला होऊ शकतो. जुन्या कुठल्याही आजाराकडे दुर्लक्ष करू नये.
शुभ अंक 9 शुभ रंग ब्राऊन.
सिंह- मन विनाकारण अशांत असेल. एकटे एकटे रहावे वाटेल. सावधानी पूर्वक मन स्थिर करून कामे करावी. आज तुम्ही गुंतवणूक करू शकता. स्वायत्त व्यापारी वर्गासाठी दिवस चांगला आहे. भागेदारीतील व्यवहारात सचेत राहावे. घाईत निर्णय घेणे टाळावे. पोटासंबंधीत आजार उद्भवू शकतात.
शुभ अंक 1, शुभ रंग पिवळा.
कन्या- आजचा दिवस आपल्यासाठी अत्यंत शुभ असेल. उत्पन्नात वाढ होईल, आर्थिक गुंतवणूक करू शकता. मित्र मैत्रिणींकडून सहयोग लाभेल. पारिवारिक जीवनात शांतता प्रस्थापित होईल. अडचणी दूर होतील. कार्यक्षेत्रात लाभ होईल. अधिकारी वर्गाकडून फायदा संभवतो. शब्द जपून वापरावे कुणाचे मन दुखणार नाही ह्याची काळजी घ्यावी. एकंदरीत आजचा दिवस अत्यंत शुभ असेल.
शुभ अंक 7 शुभ रंग ब्राऊन.
तुला- आजचा दिवस आपल्यासाठी शुभ आहे. सफलता प्राप्त होईल. कार्यक्षेत्रात व्यस्थता असतील. आपले काम प्रामाणिकपणे करावे, थोरामोठ्यांच्या शब्दाचा मान ठेवावा.
आई वडिलांसोबत वादविवाद टाळावे त्यांचा सन्मान करावा. व्यापारी वर्गास गुंतवणूक करता येईल.कुठलेही अनधिकृत काम करणे टाळावे. आज यश प्राप्त होईल. प्रेमी युगलांसाठी दिवस उत्तम आहे.आळस करणे टाळावे.
शुभ अंक 6 शुभ रंग आकाशी.
वृश्चिक- कालच्या तुलनेत आजचा दिवस चांगला असेल. आर्थिक स्थिती चांगली असेल. कार्यक्षेत्रात जबाबदारी वाढेल.वाणीवर नियंत्रण ठेवा. वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या. व्यापारी वर्गास आजचा दिवस ठीकठाक असेल. पारिवारिक जीवनात गैरसमज निर्माण होतील.
शुभ अंक 6 शुभ रंग गुलाबी.
धनु- चंचल मनावर ताबा ठेवा. अहंकार करणे टाळा.कार्यक्षेत्रात सफलता प्राप्त होईल.
कुणी गरजू असेल तर त्यास मदत करा. अहंकार करू नका, अति बोलणे टाळा. धैर्याने काम करा, खोटे बोलणे टाळा, जोडीदार नाराज असेल तर त्याची नाराजगी काढा
व्यापारी वर्गाने गुंतवणूक करतांना योग्य व्यक्ती चा सल्ला घ्यावा.
शुभ अंक 2, शुभ रंग निळा.
मकर- कुणालाही पैसे उधार देऊ नका. सावधानी पूर्वक पुढे पाऊले टाका. कुटुंबातील लोकांचा सहयोग प्राप्त होईल. आत्मविश्वास चांगला असेल. पूर्वीच्या कामात यश मिळेल.
उच्चाधिकारी तुमच्यावर नाराज होऊ शकतो. कोर्ट कचेरी संदर्भातील कामात मार्ग मिळेल. प्रेम व्यक्त करतांना विचारपूर्वक करा असफलता येवू शकते. कुणालाही पैसे उधार देऊ नका. शुभ अंक 3, शुभ रंग पिवळा.
कुंभ- आजचा दिवस आपल्यासाठी अत्यंत उत्तम आहे, अडकलेली कामे पूर्ण होतील, लाभदायक दिवस आहे कार्यक्षेत्रात फायदा होईल. गरज पडेल तेव्हा तुम्हाला साथ लाभेल. व्यापारी वर्गासाठी दिवस अत्यंत आहुभ आहे. विवाद टाळा, कर्ज घेणे टाळा. जोडीदार मदतीस उभाच असेल.
शुभ अंक 2 शुभ रंग शेंदरी.
मीन- आपल्यासाठी सर्वांगाने दिवस अत्यंत लाभदायक आहे. अज्ञात शक्तीच्या साह्याने तुम्ही संकटावर मत करत आहात असे जाणवेल. धनलाभ होईल. तसेच परदेशातून लाभ होईल. कार्यक्षेत्रात बदलाव करू शकता. व्यापारी वर्गासाठी लाभदायक दिवस आहे. नोकरदारांना चांगला दिवस आहे. आरोग्य चांगले असेल. आज गुंतवणूक करणे फायदा देऊ शकते.
शुभ अंक 3 शुभ रंग नारंगी.
ज्योतिषशास्त्री
शशीसुत
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम